जगात अनेक क्रिकेटपटू झाले, परंतु बाईक व गाड्या यांना घेऊन सर्वाधिक चर्चा जर कुणाची जर होतं असेल तर ती अर्थातच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची. धोनीच्या गॅरेजमध्ये अनेक बाईक्स व कार आहेत. त्याचे गॅरेजही आलिशान आहे.
आजपर्यंत अनेक गाड्या घेणाऱ्या धोनीच्या पहिल्या बाईकबद्दल माहित आहे का? Rajdoot Yamaha RD350 ही धोनीची पहिली बाईक आहे. ही बाईक त्याने 4,500 रुपयांना विकत घेतली होती. या बाईकचा फोटो धोनीने 2013 मध्ये एक ट्विट करत शेअर केला होता.
1996 ते 2007 पर्यंत Yamaha Thundercat चे उत्पादन होत होते. त्यानंतर कंपनीने या बाईकचे उत्पादन बंद केले होते. पण या 11 वर्षात ही बाईक बरीच लोकप्रिय झाली होती.
https://twitter.com/msdhoni/status/378067783960891392
https://twitter.com/msdhoni/status/378067423296884736
धोनीने या बाईकनंतर अनेक अलिशान गाड्या विकत घेतल्या. २००९मध्ये धोनीने Hummer H2 ही गाडी विकत घेतली. Audi Q7, Mitsubishi Pajero SFX, Land Rover Freelander 2, Mahindra Scorpio, Ferrari 599 GTO, Porsche 911 आणि Toyota Corolla या गाड्या धोनीच्या गॅरेजला आहेत.
नुकतेच काही दिवसांपूर्वी धोनीने महिंद्रा स्वराज्य 963 एफई हे ट्रॅक्टर खरेदी केले होते.