मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी (१७ मे) आयपीएल २०२२चा ६५वा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावत १९० धावा करता आल्या आणि त्यांनी ३ धावांच्या अंतराने हा सामना गमावला. हा मुंबईचा हंगामातील दहावा पराभव होता. मात्र या सामन्यात रमनदीप सिंग याचे प्रदर्शन ही मुंबईसाठी सकारात्मक बाजू राहिली.
२५ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू रमनदीपने (Ramandeep Singh) या सामन्यात मुंबईसाठी अष्टपैलू (Ramandeep Singh Allrounder Performance) खेळ दाखवला. हैदराबादच्या डावात त्याने सर्वात जास्त विकेट्स काढल्या. हैदराबादचा सलामीवीर प्रियम गर्ग याला त्याने ४२ धावांवर आपल्याच चेंडूवर झेलबाद केले. तसेच हैदराबादसाठी मॅच विनर ठरलेल्या राहुल त्रिपाठीची महत्त्वपूर्ण विकेटही त्यानेच घेतली. त्रिपाठीला त्याने तिलक वर्माच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर ऍडेन मार्करमला २ धावांवर झेलबाद केले.
अशाप्रकारे केवळ ३ षटके गोलंदाजी करताना त्याने २० धावा खर्च केल्या आणि ३ मोठ्या विक्रम संघाला मिळवून दिल्या. ही त्याची आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. गोलंदाजीनंतर फलंदाजीतही त्याने चमकदार प्रदर्शन केले.
१७व्या षटकात १४४ धावांवर संघाच्या ५ महत्त्वपूर्ण विकेट्स गेल्यानंतर रमनदीप सिंग सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने शेवटच्या ३ षटकात संघासाठी झटपट धावा जोडण्याचा प्रयत्न केला. ६ चेंडू खेळताना २३३.३३ च्या स्ट्राईक रेटने त्याने नाबाद १४ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने १ षटकार आणि १ चौकारही मारला. परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
दरम्यान रमनदीपने याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. परंतु त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. हैदराबादविरुद्धचा सामना त्याचा आयपीएल कारकिर्दीतील चौथा सामना होता. त्याने या ४ सामन्यांमध्ये ३२ धावा व ४ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’
उमरान मलिकने मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स घेत बुमराहला पछाडलं, ‘या’ विक्रमात बनला अव्वल