---Advertisement---

रमीज राजा व शोएब मलिकमध्ये ट्विटरवर जोरदार भांडणं

On: शुक्रवार, एप्रिल 10, 2020 9:50 AM
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि समालोचक रमीज राजा यांनी अनुभवी खेळाडूंच्या निवृत्त होण्याच्या वक्तव्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिक आणि राजा यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली.

मलिक आणि मोहम्मद हाफीज या पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रमीज राजा यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. हाफीजने यावेळी शांत राहणेच पसंत केले. तर मलिकने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून राजा आणि हाफीजला टॅग करत ट्वीट केले.

यावेळी मलिकने ट्वीट केले की, “राजा मी तुझ्याशी सहमत आहे. आपण तिघेही आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. त्यामुळे आपण सन्मानाने निवृत्ती घेऊया. मी फोन करतो आपण २०२२ साठी तयारी करूया.”

मलिकचे हे ट्वीट राजा यांना आवडले नाही आणि त्यांनी या ट्वीटला प्रत्युत्तर देत लिहिले की, “सन्मानाने निवृत्ती कशापासून? मी पाकिस्तान क्रिकेटसाठी जे योग्य वाटते, ते मी बोलतो.  मला असे वाटते की, पाकिस्तान क्रिकेट पुन्हा मोठ्या उंचीवर जावं. मी हे काम करण्यातून कधीच निवृत्त होणार नाही मलिक.”

 

आणखी एक ट्वीट करत रमीज यांनी लिहिले की, “२०२२ मध्ये समालोचन करणे कठीण असेल. कारण यासाठी तुला माझ्या वया इतके व्हावं लागेल. तसेच कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही. कारण इतिहास हा एक चांगला शिक्षक आहे. मी त्यावेळी निवृत्त झालो, ज्यावेळी मी पाकिस्तान संघाचा कर्णधार होतो.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---