---Advertisement---

सचिन तेंडूलकरच्या कसोटी धावांचा विक्रम मोडू शकणारे ४ फलंदाज

On: शुक्रवार, एप्रिल 10, 2020 7:40 AM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विश्वविक्रम केले आहेत. त्याने कसोटीत खेळताना २०० सामन्यात सर्वाधिक १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याच्या हा विश्वविक्रम अजून कोणीही मोडलेला नाही.

त्याचा हा विक्रम इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ऍलिस्टर कूक मोडू शकतो असे म्हटले जात होते. त्याने ३१ व्या वर्षीच कसोटीत १० हजार धावा केल्या होत्या. त्यावेळी तो कसोटीत १० हजार धावा करणारा सर्वात युवा खेळाडू होता. मात्र २०१८ मध्ये कूकने निवृत्ती घेतली. त्यामुळे आता पून्हा सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम कोण मोडणार याची प्रत्येकवेळी चर्चा होते.

सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतात हे ४ फलंदाज

१. विराट कोहली –

भारताचा कर्णधार विराट कोहलीला रनमशिन म्हटले जाते. विराटने मागील अनेक वर्षात सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने केवळ भारतीय उपखंडातच नाही तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा देशांतही मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत ७ द्विशतकी खेळी देखील केल्या आहेत.

विराटने कसोटीत आत्तापर्यंत सामन्यात ५३.६३ च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. तसेच त्याने २७ शतके केली आहेत. त्याची ही आकडेवारी पाहता तो जर चांगल्या लयीत पुढील काही वर्षे खेळला तर सचिनचा विक्रम मोडू शकतो.

२. स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने मागील काही वर्षात कसोटी फलंदाज म्हणून शानदार प्रगती केली आहे. त्याची सध्याची धावा करण्याची सरासरीही ६१ च्या पुढे आहे. सर्वोत्तम कसोटी सरासरी असणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याची गणना होती.

तसेच त्याचे वय सध्या ३० वर्षे आहे. त्याने आत्तापर्यंत ७३ कसोटी सामने खेळताना ६२.८४ च्या सरासरीने ७२२७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २६ शतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याचे वय आणि त्याचा फॉर्म पाहता त्यालाही सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

३. जो रुट – सध्याच्या काळातील फॅब फोरमधील सर्वात युवा फलंदाज म्हणजे जो रुट. त्याने त्याच्या कसोटी पदार्पणापासूच त्याच्यातील प्रतिभा दाखवण्यास सुरुवात केली. त्याने अनेक देशांमध्ये धावा केल्या. मात्र त्याची फॅब फोरमधील फलंदाजांमध्ये सर्वात कमी सरासरी आहे. तसेच त्याची शतकेही कमी आहेत.

सध्या २९ वर्षीय रुटने कसोटीत ९२ सामन्यात ४८.४० च्या सरासरीने ७५९९ धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंड सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघ असल्याने आणि रुटचे कमी वय पहाता तो देखील सचिन विक्रमाच्या जवळपास पोहचू शकतो.

४. केन विलियम्सन – न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनही फॅब फोरमधील एक फलंदाज. त्याने आत्तापर्यंत कसोटी सामने खेळणाऱ्या सर्व मोठ्या ९ संघाविरुद्ध शतके केली आहेत. त्यानेही मागील अनेक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.

त्याने कसोटीत ५०.९९ च्या सरासरीने २१ शतकांसह ६४७६ धावा केल्या आहेत. तसेच तो सध्या केवळ २९ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचा चांगला फॉर्म पुढील काही वर्षात चांगला राहिला तर तो देखील सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या जवळपास पोहचू शकतो.

ट्रेंडिंग घडामोडी – 

३ भारतीय क्रिकेटर, ज्यांच्या नाव आहे गिनेस वर्ल्ड रिकॉर्डमध्ये

न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पाणी पाजणारे ३ भारतीय कर्णधार

विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू म्हणतो, धोनीपेक्षा गंभीर भारी कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---