कोरोना नंतर क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येत आहे. जगभरातील अनेक मोठ्या लीगना देखील आता सुरुवात झाली आहे . काही दिवसांपूर्वीच अबुधाबी येथे टी10 लीगला सुरवात झाली आहे. 10-10 षटकांच्या या क्रिकेटमध्ये रसिकांना चौकार-षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये जगभरातील अनेक मोठे स्टार सहभागी होत असल्यामुळे क्रिकेट फॅन्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवत आहेत. मात्र अशातच पाकिस्तानचे माजी खेळाडू रमिज राजा यांची प्रतिक्रिया समोर येत असून, त्यांनी मोहम्मद हफीजच्या या स्पर्धेत सहभागी होण्यावर प्रश्न उपस्थित केले आहे.
राजा म्हणाले, “आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तान येथे सामने खेळण्यासाठी येत असून सर्वांनाच कोरोना नियमांचे पालन करावे लागेल. टी10 लीग मध्ये खेळणारा आसिफ अली परत आला असून मोहोम्मद हफीज अजूनही स्पर्धेत खेळत आहे. यातून तुमचा वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट होतो.”
राजा यांनी हफीज वर टीका करत हरीस राउफचे उदाहरण दिले आहे. राजा म्हणाले, “राउफने बिग बॅश लीग मध्ये खेळण्याऐवजी पाकिस्तानकडून कसोटी सामना खेळने महत्त्वाचे मानले. खेळाडू कशाला प्राथमिकता देतात यावर बरेच काही अवलंबून आहे. खेळाडू जर पाकिस्तानला महत्व देत असतील तर ते योग्य मार्गावर आहेत.”
राजा यांच्या टीकेचे कारण म्हणजे हफीजने टी10 लीग मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला आगामी मालिकेत पाकिस्तान कडून खेळता येणार नाही. हफीजच्या या निर्णयाबद्दल क्रिकेट वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मालिका विजयासाठी पाकिस्तान सज्ज, दुसऱ्या कसोटीसाठी संघ केला जाहीर
सचिनचे शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त ट्विट, चाहत्यांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीची पिछाडीवरून ब्लास्टर्सवर मात