पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दलचा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघाला टीकांचा सामना करावा लागत आहे. मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पाकिस्तान संघावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. चाहते मधल्या फळीतील फलंदाजांवर जोरदार निशाणा साधत आहेत.
‘आमच्यावर किती टीका होतेय’- बाबर आझम
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चर्चा करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी चाहत्यांबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले की, “चाहते हेच मालक आहेत. ते पाकिस्तानला एकजुट करतात. तसेच, चाहत्यांच्या चेहऱ्यावरही आनंद घेऊन येतात. हे संघात प्रत्येकजण भावनिकरीत्या सामील आहे. बाबर आझम नेहमी मला म्हणतो की, ‘पाहा लोक आमच्यावर किती टीका करतायेत.’ मी त्याला सांगतो की, आनंदी राहा. कारण, पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा इतर खेळांसारखा नाहीये, जिथे लोकांना त्याची पर्वा नसते. जेव्हा लोक लक्ष देतील, तेव्हा ते मत तयार करतील. जोपर्यंत ते रचनात्मक आहे, तोपर्यंत कुणालाच कसलीही समस्या नाहीये.”
अध्यक्ष रमीज राजा यांनी बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वीतील संघाच्या कामगिरीबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी मागील महिन्यात झालेल्या टी20 विश्वचषकासोबतच आशिया चषकातील भारतीय विजयाचीही आठवण करून दिली. तसेच, त्यांनी जोर देत म्हटले की, “लोकांनी ते प्रदर्शन नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”
भारत- पाकिस्तान सामन्याला रमीज राजांची गैरहजर
रमीज राजा यांनी पुढे सांगितले की, ते भारत- पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जाणार नाहीत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, त्यांच्याकडे भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची सहनशक्ती नाहीये. सामन्यावेळी ते इतर लोकांशी भांडण करतात. त्यामुळे ते यावेळी घरी बसूनच सामना पाहतील. रमीज राजा यांनी सांगितले की, “मी भावनिकरीत्या खूप जोडलेलो आहे. त्यामुळे मी सामना पाहायला जात नाही. कारण, तेथील लोकांसोबत माझी भांडणं होतात. अनेकांनी मला विश्वचषकातील पहिला सामना पाहण्यास सांगितले, पण मी नकार दिला. मी घरी बसूनच सामना पाहील.”
टी20 विश्वचषक 2022 हा येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ 23 ऑक्टोबर रोजी एकमेकांचा सामना करणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भुवीपेक्षा दीपकची बॉलिंग भारीच’, दिग्गज गोलंदाजाचे चकीत करणारे विधान
ठरलं तर! गांगुलीचा पत्ता होणार कट, कोण बनणार बीसीसीआयचा ‘दादा?’