---Advertisement---

‘पाकिस्तानचे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पोहोचणेही अवघड,’ पाक दिग्गजाचेच वक्तव्य

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 7:03 PM
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषक यूएईत आयोजित केला गेला आहे. याआधी विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे नंतर तो यूएईला हालवण्यात आला आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज रमीज राजाने टी२० विश्वचषकाच्या अनुषंगाने एक विधान केले आहे. बाबर आजमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ निरंतर चांगले प्रदर्शन करत नाहीये. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत त्याची क्रमवारी हेच दाखवते आहे की, ते टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

रमीज राजाने सांगितल्याप्रमाणे ईएसपीएन क्रिकइंफोने माहिती दिली, “मी प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना रोडमॅप सोपवला की, कशाप्रकारे पाकिस्तान क्रिकेट पुढे जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट ज्या समस्यांना सामोरे जात आहे. त्यावर क्रिकेट केंद्रित विचार चालू आहे. संघाचे पूर्ण प्रदर्शन सुधारण्यासाठी काय संभावित पावले उचलली जाऊ शकतात. मी आभारी आहे, त्यांनी मला बोलावले आणि मला ऐकले. ते क्रिकेटच्या परिस्थितीवर चिंतित आहेत आणि याबाबत विचार करत आहेत.”

रमीज राजाने पुढे बोलताना म्हटले, “पाकिस्तानचे प्रदर्शन खूप अनिरंतर राहिले आहे आणि इमानदारीने बोलायचे तर प्रत्येक प्रकारात संघाची क्रमवारी हेच दाखवते की पाकिस्तान स्पर्धेत अंतिम सामन्यात जागा बनवू शकत नाही. टी२० प्रकारात त्याची उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याची आशा आहे. एकदिवसीय आणि कसोटी प्रकाराविषयी बोलायचे तर त्याच्यासाठी साखळी टप्प्याच्या पुढे जाणे अवघड आहे. यासाठीच मी क्रिकेटशी संबंधीत अपडेट त्यांना दिले आहेत. आमची बैठक फायदेशीर ठरली. आता हे त्यांच्यावर आहे की, ते कशा प्रकारे पुढे जातात”

रमीज राजा बोर्डाचा अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत
इमरानची सोमवारी त्यांचा जुना संघातील सहकारी रमीज राजासोबत भेट झाली. सध्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनीचा कार्यकाळ २५ ऑगस्टला संपणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल? हा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना घ्यायचा आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीज राजा ही जबाबदारी पार पाडू शकतो किंवा सध्याचे क्रिकेट बोर्डाचे चेयरमन एहसान मनी यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मेल व्हर्जन ऑल मिराबाई चानू!! वेटलिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर करताच कोहली भयंकर ट्रोल

दिग्गज गोलंदाजाची महान फलंदाजाशी टक्कर! ‘या’ विक्रमात अँडरसनची तेंडुलकरशी बरोबरी

कोरोना महामारीत खेळाडूंच्या कमाईत कपात, मात्र अधिकाऱ्यांना बोनस; ईसीबीच्या निर्णयाने खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---