---Advertisement---

NZ vs PAK : बाबर-रिजवानची सलामी जोडी फोडल्याने भडकला दिग्गज, बाबरचे समर्थन करण्याबाबत मोठे विधान

On: शुक्रवार, जानेवारी 19, 2024 7:12 PM
Mohammad Rizwan and Babar Azam
---Advertisement---

Pakistan vs New Zealand : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका सूरू आहे. मालिकेत यजमान न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी करत 4-0 ने विजयी आघाडी घेतलेली आहे. पाकिस्तान संघाचे या मालिकेतील प्रदर्शनही खूपच निराशाजनक राहिले आहे.

संघात केलेत बरेत बदल
या मालिकेसाठी पाकिस्तानी संघात खूपच बदल झालेले आहेत. पाकचा नवीन कर्णधार शाहीन आफ्रीदीने(Shaheen Afridi) कर्णधार झाल्या पासून बाबर रिझवानच्या सलामी जोडीस वेगळे केले आहे. आता सयीम आयुब रिजवानचा नवीन जोडीदार झाला आहे. शाहीन आणि संघ व्यस्थापनाच्या याच निर्णयावर माजी पीसीबी अध्यक्ष आणि खेळाडू रमीज राजा (Rameez Raja) यांनी टीका केली आहे.

रमीज राजा आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर म्हणाला की, ‘बाबर रिझवानच्या सलामी जोडीस वेगळे करण्यासाठी बराच दबाव निर्माण करण्यात आला होता. फक्त स्ट्राइक रेटच्या जोरावर त्यांच्या जोडीला टार्गेट केले गेले. नवीन खेळाडू लीग क्रिकेट मध्ये चांगली कामगिरी करतील. पण तरीही आंतरराष्ट्रीय सांमन्यांचा दबाव वेगळाच असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अशा लोकप्रिय सलामी जोडीस तुम्ही वेगळे केले आहे.’

‘एक चांगला बदली खेळाडू असल्याशिवाय सलामी जोडी फोडण्यात काहीही अर्थ नाही. एका जोडी तयार व्हायलाच खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या जोडीला बदलून काय फायदा झाला?’ असेही तो म्हणाला. त्याचसोबत बाबरचे समर्थन करण्याबाबत तो म्हणाला, ‘माझ्यावर आरोप झाले की मी बाबरचे खूप समर्थन करतो. मी त्याचेच नाही, तर प्रत्येक खेळाडूचेच पाठराखण करतो.’ (‘Broke the opening pair that…’: Ramiz Raja slams PAK team management for splitting Babar-Rizwan combination)

वाचा पुढे –
AUS vs WI: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा, आरसीबीने सोडलेल्या गोलंदाजाने केला कहर
खेलो इंडिया युथ गेम्स २०२४ । महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी, मुलींची तेलंगणावर, तर मुलांची बिहारवर मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---