पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन रमिझ राजा यांच्या चेयरमन पदावर सतत चर्चा होत असते. खुप वेळा पुर्वीपासून म्हणले जात होते की, सध्याची सरकार त्यांची त्या पदावरुन हकालपतट्टी करु शकते आणि प्रधानमंत्री शाहबाज शरीफ हे आपल्या आवडीचा व्यक्ती तिथे बसवु शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींना त्रासुन अखेर रमिझ राजा यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
पाकिस्तानचे नवीन प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांनी अशातच बोर्डाचे तीन माजी चेयरमन सोबत चर्चा झाली. ही चर्चा पाकिस्तानच्या क्रिकेट संबंधीत होती. या चर्चेसाठीच्या बैठकीमुळे या विधानांना अधिक उधान आले. आणि म्हणल्या जाऊ लागले की, रमीझ यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन रमिझ राजा यांच्या चेयरमन पदावरुन त्यांना हटवण्यात आले आहे असे बोलण्यात येत होते.
५९ वर्षीय पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमन रमिझ राजा म्हणाले की,’ २ महीने निघुन गेले म्हणुन आता आपल्याला या गोष्टींवर बोलावेच लागेल. जर काही होयच असत तर आतापर्यंत झाले असते. जोपर्यंत तुम्ही कोणाला लगातार काम करु देणार नाही तोपर्यंत तुम्हाला पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल कसा दिसुन येणार. यात हा काही मुद्दा नाहीये. आम्ही पाकिस्तान क्रिकेटला सुधरवण्यासाठी काम करत आहोत. संविधान आपल्याला बदल करण्याची अनुमती देते मात्र परंपरा प्रमाणे आपल्याला चांगले काम करणे बंद केल्या नाही पाहिजे.
चेयरमन रमिझ राजाने आपल्या क्रिकेट कारकीर्दित ५७ कसोटी तर १९८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने त्याच्या एकट्याच्या बळावर कित्येक सामने जिंकवले आहेत. त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेयरमनपद सांभाळले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रिकेटमध्ये आयपीएल सर्वोच्च स्थानावर, आंतरराष्ट्रीय कर्णधाराचे मोठे विधान
‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान
आमंत्रण असूनही रमिझ राजा याने आयपीएल फायनल साठी उपस्थित राहणे टाळले?, कारण झाले स्पष्ट