---Advertisement---

रांची टेस्ट : मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंड संघ सज्ज, भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत ‘हे’ 11 शिलेदार उतरणार मैदानात

Ben Stokes With Test squad
---Advertisement---

इंग्लंड संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. तेव्हा सर्वांना वाटले की बॅझबॉल भारतातही प्रभावी ठरेल. पण पहिली कसोटी जिंकल्यानंतर इंग्लंडची प्रत्येक चाल उलटली पडली आहे. तसेच इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत 106 धावांनी तर तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे.

याबरोबरच, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. पण या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेले पहायला मिळाले आहे. तसेच चौथा कसोटी सामन्याचा थरार रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे

https://twitter.com/englandcricket/status/1760571342372393445

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या एक दिवस आधी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपल्या संघाची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहेत. या संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. तर भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा भाग असलेल्या दोन खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. राजकोट कसोटीत रेहान अहमद इंग्लंड संघाचा भाग होता, मात्र त्याला रांची कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. तसेच त्याच्या जागी ऑली रॉबिन्सनचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दुसरा खेळाडू मार्क वुडलाही चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले असून, त्याच्या जागी युवा खेळाडू शोएब बशीरचा संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे.

https://twitter.com/CrazeCrease/status/1760575223311581403

दरम्यान, रांची कसोटीत भारताचे अनेक दिग्गज खेळाडू या सामन्यातून बाहेर आहेत. त्यामध्ये विराट कोहलीने आधीच आपले नाव संघातून काढून घेतले आहे. तसेच बराच काळ संघाशी जोडल्या गेल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही रांची कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुलही दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहे, तो चौथी कसोटी खेळणार की नाही हाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे इंग्लंडची प्लेइंग 11 :-

बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (डब्ल्यूके), ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर, टॉम हार्टले.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---