रणजी ट्रॉफी 2018-19 या हंगामाच्या उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये केरळ, विदर्भ, कर्नाटक आणि सौराष्ट्र या चार संघांचा समावेश आहे.
24 जानेवारीपासून उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. यामधील पहिला उपांत्य सामना विदर्भ विरुद्ध केरळ आणि दुसरा उपांत्य सामना कर्नाटक विरुद्ध सौराष्ट्र असा होणार आहे.
केरळचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहचला असून त्यांनी माजी विजेत्या गुजरातवर 113 धावांनी मात करत पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली आहे.
गतविजेत्या विदर्भाने उत्तराखंडवर एक डाव आणि 115 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर तिसरा उपांत्यपूर्व सामना कर्नाटक विरुद्ध राजस्थान या संघांमध्ये झाला. यामध्ये कर्नाटकने 6 विकेट्सने विजय मिळवला.
आज (19 जानेवारी) सौराष्ट्र विरुद्ध उत्तरप्रदेश यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्राने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्षाचा पाठलाग करत सामना जिंकला. यामध्ये त्यांनी 6 विकेट्सने विजय मिळवला.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये सिक्कीम संघाचा मिलींद कुमार अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 14 सामन्यात 121च्या सरासरीने 1331 धावा केल्या आहेत. विदर्भ संघाचा वसीम जाफर 12 सामन्यांमध्ये 969 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बिहारचा गोलंदाज आशुतोष अमन 7 सामन्यात 68 विकेट्स घेताना या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. मेघालयकडून खेळणारा अष्टपैलू गुरींदर सिंगने 8 सामन्यात 53 विकेट्स घेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार कोहलीने केले एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक, चाहतेही ऐकुन होतील खुश
–जयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…
–असा आहे टीम इंडियाचा २० दिवसांचा न्यूझीलंड दौरा