कोरोना व्हायरसमुळे गेल्या २ वर्षात भारतातील मानाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला (Ranji Trophy) ब्रेक लागला होता. पण, या ब्रेकनंतर १७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेच्या नवीन हंगामाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या स्पर्धेत ३८ संघांमध्ये एकूण १९ सामने एकाचवेळी सुरु झाले. या १९ सामन्यांमध्ये मिळून एकूण ११ खेळाडूंनी शतके ठोकली. तसेच एका गोलंदाजाने हॅट्रीक घेतली.
रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीच्या ११ शतकवीर खेळाडूंमध्ये दोन असेही खेळाडू होते, ज्यांनी १७ फेब्रुवारीला प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. हे दोन खेळाडू म्हणजे यश धूल (Yash Dhull) आणि पवन शाह (Pavan Shah). यश धूलने दिल्लीकडून प्रथम श्रेणी पदार्पण करताना तमिळनाडू विरुद्ध ११३ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे धूलने नुकताच कर्णधार म्हणून १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे. तसेच पवन शाहने महाराष्ट्र संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना १६५ धावा केल्या.
याशिवाय शतक करणाऱ्या ११ खेळाडूंमध्ये बिहार, कर्नाटक आणि मुंबईच्या प्रत्येकी २ खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर केरळ, हरियाणा आणि पुदुच्चेरी संघाच्या प्रत्येकी एका खेळाडूने शतक केले.
FIFTY on First-Class debut! 👏 👏
Yash Dhull – India's #U19CWC-winning captain – begins his #RanjiTrophy journey in style. 👍 👍 @Paytm #DELvTN
Follow the match ▶️ https://t.co/ZIohzqOWKi pic.twitter.com/mrbYBHNrBL
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
बिहारकडून मिझोरमविरुद्ध बाबुल कुमारने १२३ धावांची आणि सकिबुल गनीने १३६ धावांची खेळी केली. तसेच कर्नाटककडून कर्णधार मनिष पांडेने आक्रमक खेळ करताना रेल्वेविरुद्ध १५६ धावांची खेळी केली, तर कृष्णमुर्ती सिद्धार्थ पहिल्या दिवशी १४० धावांवर नाबाद राहिला.
मुंबईकडून भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) सौराष्ट्र विरुद्ध १०८ धावांची खेळी केली. तसेच मुंबईकडून सर्फराज खाननेही शतकी खेळी केली. तो पहिल्या दिवशी १२१ धावांसह नाबाद राहिला.
याशिवाय जम्मू आणि काश्मीर विरुद्ध पुदुच्चेरीकडून पारस डोगराने १०८ धावांची खेळी केली, तर केरळकडून रोहन कुन्नुमलने १०७ धावांची खेळी मेघालयविरुद्ध खेळली. तर हरियाणाकडून यशु शर्माने त्रिपुराविरुद्ध १०१ धावांची खेळी केली.
मनिपूरच्या गोलंदाजाची हॅट्रीक
रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेत पहिल्याच दिवशी ११ खेळाडूंनी शतक तर केलेत, पण मनिपूरच्या एल किसन सिंघाने हॅट्रीक घेण्याचाही कारनामा केला. त्याने अरुणाचल विरुद्ध हॅट्रीक घेतली.
48.5: Kamsha Yangfo ✅
48.6: Akhilesh Sahani ✅
50.1: Suraj Tayam ✅Here's how Manipur's L. Kishan Singha scalped a hat-trick against Arunachal Pradesh. 👌 👌 #RanjiTrophy | #MANvARP | @Paytm
Scorecard ▶️ https://t.co/T6uhRgYszI pic.twitter.com/uywODqSCeq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2022
यावर्षी रणजी ट्रॉफी २ टप्प्यात खेळवली जाणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यात साखळी फेरीचे सामने सुरू झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
तिघींनी अर्धशतके करून भारतीय महिलांच्या पदरी निराशाच! न्यूझीलंडने जिंकली तिसरी वनडे
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत- वेस्ट इंडिज दुसरा टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही