रणजी ट्रॉफी २०२२च्या हंगामातील तीन उपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल आले आहेत. मुंबई, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हे संघ उपांत्यफेरीत पोहोचले आहेत. तर झारखंड विरुद्ध बंगाल हा सामना सुरू आहे. यामध्ये बंगाल ५६१ धावांनी मागे आहे. त्याचबरोबर मुंबई विरुद्ध उत्तराखंड या सामन्यात अनेक विश्वविक्रम रचले गेले आहेत.
मुंबई विरुद्ध उत्तराखंड यांच्यात दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना (६-१० जून) केएससीए ग्राऊंड दोन, अलूर, बेंगलोर येथे खेळण्यात आला आहे. या सामन्यात मुंबईने उत्तराखंडवर ७२५ धावांनी विजय मिळवत विश्वविक्रम केला आहे. हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील धावांच्या तुलनेतील मोठा विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच मुंबईने न्यू साउथ वेल्सचा ९२ वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. न्यू साउथ वेल्सने १९२९-३०साली क्विन्सलॅंडचा ६८५ धावांनी पराभव केला होता. त्यांचा हा विक्रम कोणत्याच संघाला तोडता आला नाही पण मुंबईने हे करून दाखवले आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील धावांच्या तुलनेतील ऐतिहासिक विजय:
१. मुंबई (विरुद्ध उत्तराखंड, २०२२) – ७२५ धावा
२. न्यू साउथ वेल्स (विरुद्ध क्विन्सलॅंड, १९२९-३०) – ६८५ धावा
३. इंग्लंड (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९२८-२९) – ६७५ धावा
४. न्यू साउथ वेल्स (विरुद्ध साउथ ऑस्ट्रेलिया, १९२०-२१) – ६३८ धावा
या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य सुवेद पारकर आणि सर्फराज खान यांनी उत्तराखंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (७ जून) मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या पारकरने द्विशतक ठोकले. दिग्गज अजिंक्य रहाणे या सामन्यासाठी अनुपस्थित असल्यामुळे सुवेदला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने २१ चौकार आणि ४ षटकार मारत ४४७ चेंडूत २५२ धावा केल्या आहेत तर सर्फराजने १५३ धावांची खेळी केली.
🚨 RECORD-BREAKING WIN 🚨
Mumbai march into the #RanjiTrophy semifinals by securing a 725-run victory – the highest margin of win (by runs) – in the history of First-Class cricket. 👏 👏 #Paytm | #MUMvCAU | #QF2 | @MumbaiCricAssoc
Scorecard ▶️ https://t.co/9IGODq4LND pic.twitter.com/Qw47aSLR7v
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 9, 2022
मुंबईने पहिल्याच डावात ८ विकेट्स गमावत ६८७ धावांवर डाव घोषित केला. त्याच्या प्रत्यूत्तरात उत्तराखंडचा पहिलाच डाव ११४ धावांवर संपुष्टात आला. तर मुंबईने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा फलंदाजी केली. यावेळी यशस्वी जायसवालने शतकी खेळी केली. या डावात मुंबईने ३ विकेट्स गमावत २६१ धावा केल्या.
धवल कुलकर्णी, शम्स मुलाणी यांंनी दोन्ही डावात अप्रतिम गोलंदाजी करत उत्तराखंडच्या फलंदाजांना चांगलेच रोखून धरले होते. त्यांनी दुसऱ्या डावात १० विकेट्स गमावत ६९ धावा केल्या. या सामन्यात मुलाणीने ८ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करण शर्माची ‘कर्णधार’ खेळी, उत्तर प्रदेशची कर्नाटकवर ५ विकेट्सने मात; सेमी फायनलमध्येही प्रवेश
हॅरिस राउफचा विकेट्सचा चौकार, बाबर आझमचे शतक; पहिल्या वनडेत पाकिस्तानचा ५ विकेट्सने विजय
सामना हरला म्हणून काय झालं, फलंदाजाच्या त्या ‘नो लूक सिक्स’चीच सर्वत्र रंगलीय चर्चा