भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रमुख रेड बॉल स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा टप्पा 23 जानेवारी रोजी सुरू झाला. ज्यात अनेक स्टार खेळाडू देखील खेळत आहेत, जे अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग होते. तर या दरम्यान संघाबाहेर असलेले खेळाडू देखील चांगली कामगिरी करून पुनरागमनाचा दावा करण्याचा विचार करत आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात, मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरशी होत आहे. ज्यामध्ये स्टार भरलेल्या मुंबई संघाची स्थिती वाईट दिसत आहे. दुसऱ्या डावातही मुंबईचे मुख्य फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत. या दरम्यान खराब पंचगिरीवरून बराच गदारोळ झाला.
जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या दुसऱ्या डावात, मुंबईने जलद सुरुवात केली. सलामीवीरांनी झटपट 54 धावा केल्या पण नंतर विकेट पडू लागल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरला पंचांनी 19व्या षटकात जीवनदान दिले. उमर नझीर मीरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अय्यरने कव्हर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या जाड कडाला लागून विकेटकीपरकडे गेला आणि त्याने यशस्वी झेल घेतला. अशा परिस्थितीत, गोलंदाजासह जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी विकेटचा आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण अंपायरने बोट वर केले नाही आणि अय्यर बचावला. पंचांच्या निर्णयाने विरोधी संघाचे खेळाडू खूप निराश दिसत होते.
It was a clear edge still umpire given it not-out
After this, Ajinkya Rahane was given out on a no ball but later umpire called him back from the dressing room that too when Shardul was already on the crease.
The bias towards Mumbai is real#RanjiTrophy #INDvsENG pic.twitter.com/k03FbTLp8z
— 𝐊𝐨𝐡𝐥𝐢𝐖𝐚𝐥𝐚𝟏𝟖★ (@KohlikaDost18) January 24, 2025
पंचांनी दिलेल्या दिलासाचा श्रेयस अय्यरला फारसा फायदा घेता आला नाही. 22व्या षटकात 86 धावांवर त्याची विकेट पडली. अय्यरने 16 चेंडूत चार चौकारांसह 17 धावा केल्या. श्रेयसचा बळी आकिब नबीने घेतला आणि तो झेलबाद झाला. मात्र, यावेळी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे अय्यरला बाद देण्याच्या निर्णयावर खूश नव्हता आणि तो पंचांशी बोलतानाही दिसला.
सोशल मीडियावरही चाहत्यांनी खराब अंपायरिंगबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यात सुधारणा करण्यासाठी बोर्डाला काही प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीचा वनडे संघ जाहीर, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही
इतक्या वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार टी20 आंतरराष्ट्रीय सामना, पाहा टीम इंडियाचा विक्रम कसा?
दुसऱ्या डावातही भारतीय सलामीवीर फ्लाॅप, रणजीमध्येही रोहितच्या पदरी निराशाच.!