भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला होता. अलीकडे अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक करारातूनही बाहेर केले. यासोबत रणजी ट्रॉफीमध्ये न खेळल्याने अय्यर चर्चेत होता. मात्र आता तो मैदानात परतला आहे. पण पुनरागमन सामन्यात तो अवघ्या 3 धावा करून आऊट झाला आहे.
रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान याचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत मुंबईने 51 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. मुंबई अजूनही 21 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा निराशा केली. तर बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रेयस अय्यर याचं निराशाजनक कमबॅक राहिलं आहे.
याबरोबरच मुंबईची पहिल्या डावातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ 5, भुपेन ललवाणी 15 आणि मोहित अवस्थी 2 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 3 आऊट 48 असा झाला. मात्र त्यानंतर मुशीर खान आणि कॅप्टन रहाणे या दोघांनी चिवट खेळी करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांना फार यश आलं नाही. तामिळनाडूचा कॅप्टनने मुंबईचा कॅप्टन रहाणेला आऊट केल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयसकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मुंबई अडचणीत असल्याने श्रेयसकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण श्रेयसने निराशा केली. श्रेयस 8 बॉलमध्ये 3 धावा करुन माघारी परतला आहे.
Shardul Thakur gets to his century in style 🔥🔥
What a time to score your maiden first-class 💯
The celebrations say it all 👌👌@imShard | @IDFCFIRSTBank | #RanjiTrophy | #MUMvTN | #SF2
Follow the match ▶️ https://t.co/9tosMLk9TT pic.twitter.com/3RI9Sap6DO
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 3, 2024
दरम्यान, मुंबईने मुशीर खान याच्या रुपात 6 वी विकेट गमावल्यानंतर शार्दूल ठाकुर मैदानात आला. मुशीरनंतर शम्स मुलानी आऊट झाला. मुंबईने सातवी विकेट गमावली. त्यानंतर शार्दुलने हार्दिक तामोरे याच्यासह आठव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक 35 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर शार्दुलने मुंबईच्या डावातील 81 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर तामिळनाडूच्या बाबा इंद्रजीथ याच्या बॉलिंगवर पुढे येत खणखणीत सिक्स खेचला आणि शतक पूर्ण केलं. शार्दुलने 89 बॉलमध्ये आपलं पहिलवहिलं शतक पूर्ण केलं. शार्दुलच्या या शतकी खेळीत 12 चौकार आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर शार्दुलने 113.5 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Ranji Trophy 2024 : परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध शार्दूल ठाकुरचं दमदार शतक
- IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात, बाइक पडली महागात