अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आणि विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल बहुचर्चित टि१० स्पर्धा खेळणार आहे. यावेळी प्रथमच या स्पर्धेत ८ संघ करण्यात आले आहेत.
सोमवारी या स्पर्धेसाठी दुबईमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. यावेळी खेळाडूंचा मिनी ड्राॅफ्ट करण्यात आला. आता २ सप्टेंबरला खेळाडूंचा मुख्य ड्राॅ करण्यात आला.
राशिद खान आणि आंद्रे रसेल सोडून ख्रिस लीन आणि ब्रेंडन मॅक्क्युलम हे टी२० स्पेशलिस्ट खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत.
राशिद खान हा या स्पर्धेत मराठा अरेबियन्स संघाकडून तर ब्रेंडन मॅक्क्युलम रजपूत संघाकडून खेळताना दिसणार आहे.
पाख्तून संघाने शाहिद आफ्रिदीला कर्णधारपदी कायम केले आहे. इयान माॅर्गन केरला किंग्जकडे तर शोएब मलिक पंजाब लेजेंड संघाकडून खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला
–रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर
–भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले