दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये 500 विकेट्स पूर्ण करुन अफगाणिस्तानच्या राशिद खान याने एक मोठा विक्रम केला. अवघ्या 24 व्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा राशिद हा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा पराक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होने केलेला. ब्राव्होने टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 614 बळी घेतले आहेत. राशिदने आपल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीत टी20 मध्ये मध्ये 500 विकेट्स करुन क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
जगभरातील फ्रँचायझी संघ टी20 लीगमध्ये राशिदला (Rashid Khan) त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी स्पर्धा करतात. दक्षिण आफ्रिकेत (south Africa) खेळल्या जात असलेल्या टी20 लीगमध्ये 23 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरला. प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एमआय कॅपिटल्सकडून खेळताना राशिदने 4 षटकात केवळ 16 धावा देत 3 बळी घेतले. ही कामगिरी त्याच्या संघाला अपेक्षित होती. या तीन बळींसह राशिदने टी20 क्रिकेटमध्ये 500 बळींचा आकडा गाठला.
टी20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे 5 गोलंदाज
टी20 सर्वाधिक बळींच्या यादीत ड्वेन ब्राव्होचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने 556 टी20 सामन्यात 614 बळी घेतले आहेत. त्यानंतर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 371 सामने खेळून या 500 विकेट्स घेतल्या. तिसरा क्रमांक वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनचा लागतो. ज्याने 474 बळी घेतले आहेत. या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर व पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. त्या दोघांनी अनुक्रमे 466 व 436 बळी मिळवले आहेत. या यादीत भारताचा युजवेंद्र चहल 298 बळींसह 16 व्या क्रमांकावर आहे. (Rashid Khan Complete 500 T20 Wickets In Just Age Of 24)
टी20 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे टॉप 5 गोलंदाज
ड्वेन ब्राव्हो – (614 बळी, 556 सामने)
राशिद खान – (500 बळी, (371 सामने)
सुनील नरेन – (474 बळी, 435 सामने)
इम्रान ताहिर – (466 बळी, 373 सामने)
शाकिब हसन – (437 बळी 390 सामने)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोरमध्ये घोंघावले ‘हिटमॅन’ वादळ! तब्बल 1100 दिवसांनी रोहितचे वनडे शतक
स्म्रीती मंधाना ऑन फायर! विंडीजविरुद्ध झंझावाती फिफ्टी ठोकत रचला विक्रम, बनली जगातली तिसरी ओपनर