---Advertisement---

‘करामती खान’ची अजून एक करामत! वेंकटेशला बाद करत राशिदने गुजरातच्या हेड कोचशीच साधली बरोबरी

Rashid-Khan
---Advertisement---

गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात शनिवारी (२३ एप्रिल) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ३५वा सामना खेळला गेला. गुजरातने पुन्हा एकदा चांगला खेळ दाखवत हा सामना ८ धावांनी जिंकला. हा त्यांचा हंगामातील सहावा विजय होता. या सामन्यादरम्यान गुजरातकडून फिरकीपटू राशिद खान यानेही मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. राशिदने या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

या सामन्यात (GT vs KKR) प्रथम फलंदाजी करताना गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकात्याचा संघ १४८ धावाच करू शकला. यादरम्यान त्यांनी ८ विकेट्सही गमावल्या. यामध्ये फिरकीपटू राशिदच्या (Rashid Khan) २ विकेट्सचेही योगदान होते.

राशिदने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत कोलकाताच्या २ फलंदाजांना बाद केले. त्याने वेंकटेश अय्यरला अभिनव मनोहरच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर शिवम मावीलाही त्रिफळाचीत केले. यासह त्याने आयपीएलमधील आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. वेंकटेशची विकेट घेत त्याने या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

यासह राशिद सर्वात जलद १०० विकेट्स (Rashid Khan 100 IPL Wickets) पूर्ण करणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. कोलकात्याविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ८३ वा सामना होता. याबाबतीत त्याने गुजरात संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि अमित मिश्राची बरोबरी केली आहे. या दोघांनीही ८३ सामने खेळताना हा पराक्रम केला होता. तसेच भुवनेश्वर कुमारने ८१ आणि लसिथ मलिगांने ७० सामने खेळताना ही अद्वितीय कामगिरी केली होती. 

सर्वात जलद १०० आयपीएल विकेट्स (सामन्यांनुसार)-
७० विकेट्स- लसिथ मलिंगा
८१ विकेट्स- भुवनेश्वर कुमार
८३ विकेट्स- अमित मिश्रा
८३ विकेट्स- आशीष नेहरा
८३ विकेट्स- राशिद खान *

गुजरातच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा प्रशंसनीय कामगिरी
गुजरातच्या १५७ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना त्यांच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. राशिदव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि यश दयाल यांनीही २ विकेट्स घेतल्या. तसेच अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्युसन यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार बनण्याच्या बातम्यांवर स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी एवढंच सांगेल की…’

नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, ‘पंच खेळाला नियंत्रित करतात’

बटलर आहे कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये, आवडीच्या स्टेडियमवर सलामीवीराने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---