आयपीएलच्या 43 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पंजाबच्या फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. खेळपट्टीवर अधिक काळ टिकण्यात कुणालाच यश आले नाही. मात्र, या सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्याच विकेटचीच चर्चा होत आहे. हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने फेकलेली फिरकी त्याला समजलीच नाही आणि तो त्रिफळाचित झाला.
पंजाबच्या डावाच्या 11 व्या षटकात 27 धावांवर खेळत असलेल्या केएल राहुलला रशिद खानने त्रिफळाचित केले. रशिदने केएल राहुलला (केएल राहुल) फ्लाइटेड चेंडू फेकला. त्या चेंडूवर राहुलले ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूने थेट त्रिफळा उडवला. राहुलला हा चेंडू समजलाच नाही. काही काळ राहुलला समजू शकले नाही की तो त्रिफळाचित कसा झाला.
हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि या चेंडूला मॅजिक बॉल असे नाव देण्यात आले आहे
WATCH – Rashid's magic delivery to Rahul
KL Rahul was clean bowled by a splendid @rashidkhan_19 delivery. This went through and hit timber. Top-class from Rashid.https://t.co/vq7wIIfZTi #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) October 24, 2020
https://twitter.com/R5Cricket/status/1320029669475766272
रशीद खानने आतापर्यंत या स्पर्धेत 14 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी दर इतर गोलंदाजांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. आयपीएल 2020 मध्ये राशिद खानचा इकॉनॉमी दर 5.30 आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 127 धावा केल्या.प्रत्युत्तरादाखल हैदराबाद संघाला केवळ 114 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL: धोनीने सुरू केली पुढील वर्षाची तयारी; मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर सांगितला प्लॅन
हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला
ट्रेंडिंग लेख –
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी