---Advertisement---

भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या राशिद खानच्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद; मॅक्सवेलशी केली बरोबरी

Rashid-Khan
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३५ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी येथे पार पडला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. त्यांना २० षटकांत ९ बाद १५६ धावा करता आल्या, पण यादरम्यान फलंदाजी करताना राशिद खानच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. 

गुजरातकडून खेळणारा राशिद खान (Rashid Khan) ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यावेळी तो त्याच्या खेळीतील दुसराच चेंडू खेळताना बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्याला टीम साऊदीने १८ व्या षटकात उमेश यादवच्या हातून झेलबाद केले. पण, राशिदची ही शुन्यावर बाद होण्याची आयपीएलमधील ११ वी वेळ होती.

त्यामुळे राशिद आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारा परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याबाबतीत ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली आहे. मॅक्सवेल देखील आयपीएलमध्ये ११ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुनील नारायण आणि एबी डिविलियर्स आहे. हे दोघेही प्रत्येकी १० वेळा आयपीएलमध्ये शुन्यावर बाद झाले आहेत.

रोहित सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. तो १४ वेळा आयपीएलमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. त्याच्यापाठोपाठ पार्थिव पटेल, हरभजन सिंग, पियुष चावला, मनदीप सिंग, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू हे १३ वेळा आयपीएलमध्ये शुन्य धावांवर बाद झाले आहेत (Most duck in IPL).

गुजरातने जिंकला सामना
या सामन्यात गुजरातकडून (KKRvGT) हार्दिक पंड्याने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ६७ धावांची खेळी केली. तर कोलकाताकडून आंद्र रसेलने ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १५७ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकात ८ बाद १४८ धावा करता आल्या. त्यामुळे कोलकाताला ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या – 

आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय

एकच षटक टाकले पण जबरदस्त टाकले! रसेलने विसाव्या ओव्हरमध्ये घेतल्या चक्क ४ विकेट्स, केला वर्ल्ड रेकॉर्ड

बटलर आहे कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये, आवडच्या स्टेडियमवर सलामीवीराने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---