---Advertisement---

धोनीबद्दल एका शब्दात व्यक्त होण्यास चाहत्याने सांगताच राशीद खानने दिले ‘असे’ उत्तर की चाहते झाले भलतेच खूश

On: शुक्रवार, जून 4, 2021 9:45 PM
---Advertisement---

सध्याच युग हे सोशल मिडियाचं युग मानलं जात. आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच सोशल मिडियाने जोडले गेले आहेत. सोशल मीडियाच्या बाबतीत क्रिकेटपटूसुद्धा काही मागे नाहीत. सगळेच क्रिकेटपटू रोज काहीना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात येत असतात. असाच प्रसंग अफगाणिस्तानचा खेळाडू राशीद खानसोबत झाला.

राशीद खानने त्याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट टाकली आणि त्यात त्याने चाहत्यांसोबत प्रश्न आणि उत्तर असा संवाद साधण्याचे ठरवले. त्यात एका चाहत्याने राशीद खानला धोनीबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर राशीदने दिलेल्या उत्तराने धोनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.

राशीद खान मुळचा अफगाणिस्तानचा जरी असला तरी त्याला भारतीय खेळाडू आणि भारतीय लोकांबद्दल प्रेम आहे. राशीद नेहमीच मुलाखतीमधून भारतीय लोकांचा आणि भारतीय खेळाडूंचा आदर व्यक्त करत असतो.

एका चाहत्याने राशीदला धोनीबद्दल एका शब्दात व्यक्त होण्यास सांगितले. त्यावर त्याने सांगितले की, ‘धोनीबद्दल बोलायचे झाल्यास एक शब्द कमी पडेल इतका महान खेळाडू आहे.’ राशीदच्या ह्या उत्तरावर धोनीचे चाहते जाम खुश झाले आहेत.

Screengrab: Instagram/Rashid Khan

राशीदला चाहत्यांनी अजून काही प्रश्न विचारले होते त्यात  विराट कोहलीबद्दल विचारलेल्या प्रश्नाच उत्तर त्याने ‘किंग’ असे दिले. एका चाहत्याने त्याला तू चित्रपटात (बॉलीवूड) मध्ये कधी काम करणार असे विचारल्यास त्याने ‘लवकरच’ असे उत्तर दिले.

राशीद खान सध्याचा अफगाणिस्तानचा महत्वाचा खेळाडू असून त्याने खूप सामने आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकवून दिले आहेत. राशीदने खानने आजवर एकदिवसीय सामन्यांत १४०,  कसोटी सामन्यांत ३४,आणि, आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ९५ गडी बाद केले आहेत. राशीद खान आईपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. त्याव्यतिरिक्त राशीद पीएसएल, सीपीएल आणि बीबीएल ह्या व्यावसायिक लीग स्पर्धासुद्धा खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा अभिनेत्री निमरत कौर यांच्याबरोबर जोडले गेले होते नाव तेव्हा रवी शास्त्री दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

शेवटी त्याने इंग्लंडला विश्वविजेते बनविलेच! कहाणी ‘बिग बेन’ ची

बरोबर २८ वर्षांपुर्वी २३ वर्षांच्या शेन वाॅर्नने टाकला होता ‘बाॅल ऑफ द सेंच्युरी’, पहा तो खतरनाक चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---