वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 30वा सामना सोमवारी ( 30 ऑक्टोबर) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जातोय. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे रंगणार आहे. या सामन्याआधी झालेली नाणेफेक अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना पाकिस्तानचा अनुभवी फिरकीपटू राशिद खान याच्यासाठी महत्त्वाचा ठरला. राशिद या सामन्यासाठी मैदानात उतरला तेव्हा तो आपल्या 100 व्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात खेळताना दिसला.
अफगाणिस्तानचा आजवरचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटू म्हणून राशिदकडे पाहिले जाते. केवळ 25 वर्षाच्या असलेल्या राशीत याने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 99 वनडे सामने खेळताना तब्बल 178 बळी मिळवले आहेत. तसेच त्याने काही काळ संघाचे नेतृत्व देखील केले होते. अफगाणिस्तानसाठी 100 वनडे खेळणारा तो चौथा खेळाडू बनला.
अफगाणिस्तान साठी मोहम्मद नबी याने सर्वाधिक 152 सामने खेळले आहेत. त्यानंतर माजी कर्णधार असगर अफगाण याने 114 सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सध्या संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रहमत शहा 102 सामने खेळलेला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून राशिद याचे अभिनंदन केले गेले. संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांच्यातर्फे त्याला स्मृतीचिन्ह देण्यात आले.
(Rashid Khan Playing His 100th ODI Against SL Fourth Afghan Reach There)
महत्वाच्या बातम्या –
शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद