एकदिवसीय सामन्याच्या 53 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकला आहे. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिकेत 2-0 ने आघाडी घेत इतिहास रचला आहे.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका यूएई मध्ये खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला विजय नोंदवला होता. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही अफगाणिस्तानने आफ्रिकन संघाचा पराभव करून इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने शारजाह येथे खेळला जाणारा दुसरा एकदिवसीय सामना 177 धावांनी जिंकला. हा त्यांचा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.
HISTORY AT SHARJAH 🔥
AFGHANISTAN WON AN ODI SERIES AGAINST SOUTH AFRICA FOR THE FIRST TIME EVER. 🫡 pic.twitter.com/6O3M8P6Raa
— Johns. (@CricCrazyJohns) September 20, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तान संघाने रहमानउल्ला गुरबाजच्या शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 311 धावा केल्या. गुरबाजने आपल्या वनडे कारकिर्दीतील 7 वे शतक झळकावले. त्याने 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. त्याच्याशिवाय रहमत शाह (50) आणि अजमतुल्ला उमरझाई (86) यांनीही अर्धशतके झळकावत संघाला 300 चा मोलाचा पल्ला गाठण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 34.2 षटकांत अफगाणिस्तानच्या कहरात 134 धावांत गारद झाला. आफ्रिकन संघाच्या कोणत्याही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा गाठता आला नाही. तर 5 फलंदाज एकेरी अंकात बाद झाले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली.
अफगाणिस्तानसाठी बर्थडे बॉय राशिद खान गोलंदाजीत कहर कामगिरी केला. त्याने केवळ 19 धावा देत 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय नांगेलिया खरोटे यानेही 4 विकेट्स मिळवल्या. रशीद खानला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा-
विराट कोहलीची शतकाची भूक संपली! शेवटची सेंच्युरी कधी केलीय?
IND vs BAN: टीम इंडिया बांगलादेशला किती धावांचे टार्गेट देऊ इच्छिते? रवींद्र जडेजाने सांगितलं
शतकवीर अश्विनने सांगितले त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे रहस्य; म्हणाला, “4-5 वर्षांपूर्वी…”