अफगाणिस्तानचा नवा टी20 कर्णधार म्हणून प्रसिद्ध लेगस्पिनर राशिद खानची नियुक्ती करण्यात आली आहे. तो अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीची जागा घेईल. 24 वर्षीय राशिद खान यापूर्वीही कर्णधाराच्या भूमिकेत दिसला आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकापूर्वी त्याला कर्णधार बनवण्यात आले होते. परंतु, बोर्डाने संघ निवडीपूर्वी आपल्याशी चर्चा न केल्याचा आरोप करत त्याने कर्णधारपद सोडले होते. यानंतर नबीने ही जबाबदारी स्वीकारली. यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकानंतर त्यानेही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला.
Meet Our T20I Captain 🚨🤩@rashidkhan_19, Afghanistan’s Cricketing Wizard, has replaced @MohammadNabi007 as AfghanAtalan’s captain for the T20I format.
Read More 👉 https://t.co/fYUYXrjmxe pic.twitter.com/ZKz9IuVGtL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 29, 2022
राशिद याला कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ म्हणाले की,
“राशिद खान हे अफगाणिस्तान क्रिकेटमधील मोठे नाव आहे. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा घेत तो संघाला एका नव्या उंचीवर नेण्यास मदत करेल. राशिदला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याची टी20 कर्णधार म्हणून पुन्हा नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.”
पुन्हा एकदा कर्णधारपद मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना राशिद म्हणाला,
“ही नक्कीच सर्वात मोठी जबाबदारी असते. अफगाणिस्तानमध्ये सध्या चांगले गुणवान खेळाडू तयार होत आहेत. या सर्वांशी माझे चांगले नाते असून, अफगाणिस्तान क्रिकेटला आणखी पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू.”
राशिदने अफगाणिस्तानचे 74 टी20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करत 122 बळी घेतलेत. टीम साऊदी आणि शकिब अल हसननंतर तो जगातील तिसरा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 बळी घेणारा गोलंदाज आहे. साऊदीच्या 134 तर शकिबच्या खात्यात 128 बळी आहेत. फ्रँचायझी क्रिकेटमध्येही राशिदला जगभरात मागणी असते. तो 2015 पासून फ्रँचायझी क्रिकेट खेळतोय. त्याने आतापर्यंत 15 संघांचे प्रतिनिधित्व केले असून, 361 टी20 सामन्यात त्याने एकूण 491 बळी घेतलेत.
(Rashid Khan Re Appointed As Afghanistan T20I Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन