सध्या बिग बॅश लीग (big bash league) स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौफेर फटकेबाजीसह अनेक मोठ-मोठे विक्रम देखील होताना पाहायला मिळत असतात. नुकताच ॲडीलेड स्ट्रायकर्स (Adelaide strikers) आणि ब्रिस्बेन हिट (Brisbane heat) संघ आमने सामने होते. या सामन्यात ॲडीलेड स्ट्रायकर्स संघाने ७१ धावांनी जोरदार विजय मिळवला. दरम्यान, हा राशिद खान याच्या टी२० कारकिर्दीतील ३०० वा सामना होता. हा सामना त्याच्या आठवणीतला सामना ठरला आहे.
राशिद खान (Rashid Khan) हे टी२० क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. त्याला टी२० चा सर्वोत्तम गोलंदाज का म्हटलं जात हे तो नेहमीच मैदानावर सिद्ध करत असतो. टी२० क्रिकेटमध्ये त्याने अनेक मोठमोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ३०० व्या टी२० सामन्यात त्याने १७ चेंडूंमध्ये ६ गडी बाद करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. या कामगिरीमुळे ॲडीलेड स्ट्रायकर्स संघाचा डाव अवघ्या ९० धावांवर संपुष्टात आला.
राशिद खानला (Rashid Khan records) सुरुवातीच्या ७ चेंडूंमध्ये एकही फलंदाजाला बाद करण्यात यश आले नाही. त्यानंतर ८ व्या चेंडूवर त्याने सॅम हेझलेटला ० धावांवर यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर त्याने जॅक लेहमनला ० धावांवर त्रिफळाचित केले. यावेळी त्याला हॅट्रिक करण्याची संधी होती. परंतु, त्याला हॅट्रिक घेता आली नाही.
त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने विलला ० धावांवर बाद केले. राशिदने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यूला १ आणि तिसऱ्या चेंडूवर मुजीब उर रहमानला ० धावांवर बाद करत माघारी धाडले. अशा स्थितीत त्याला पुन्हा एकदा हॅट्ट्रिक घेण्याची संधी होती, परंतु पुन्हा एकदा त्याला हॅट्रिक पूर्ण करता आली नाही. शेवटच्या चेंडूवर त्याने लियामला ० धावांवर बाद केले आणि ब्रिस्बेनचा डाव ९० धावांवर आटोपला.
For your viewing pleasure, all six of @rashidkhan_19's historic wickets in his 300th T20 match!
He leaves #BBL11 in the lead of the BKT Golden Arm standings! 👑 pic.twitter.com/Zct68mOoxl
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2022
टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी
राशिद खानची ही टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ४ षटकात १७ धावा देत ६ गडी बाद केले. टी २० क्रिकेटमध्ये त्याने चौथ्यांदा ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे, तर ७ वेळेस त्याने ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तसेच त्याच्या टी२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३०० टी२० सामन्यात १७ च्या सरासरीने ४२० गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
लखनऊ, अहमदाबाद फ्रँचायझींचा अधिकृत मंजूरी, पण खेळाडू निवडण्यासाठी मिळणार किती वेळ? घ्या जाणून
कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल, स्मिथने चँपियन कर्णधार विलियम्सनला पछाडले; तर जेमिसनचीही मोठी झेप
हे नक्की पाहा :