अफगाणिस्तानच्या रशिद खानने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टी-20 क्रमवारीत गोलंदाजीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
बांगलादेशविरूद्ध झालेल्या टी-20 मालिकेत रशिदने केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला आपले अव्वल स्थान कायम राखता आले आहे.
या टी-20 मालिकेत रशिदने 6.12 च्या सरासरीने 3 सामन्यात आठ बळी मिळवले होते. या मालिकेतून रशिदने 59 रेटिंग्सची कमाई करत दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या पाकिस्तानच्या शाहबाद खानला 80 गुणांनी मागे टाकत आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे.
तर राशिद खानचा संघ सहकारी असलेल्या मुजिब ऊर रहमानने 62 व्या स्थानावरून त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम म्हणजेच 51 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना चमकदार कामगिरी करून मुजिब ऊर रहमानने क्रिकेटमधील दिग्गजांकडून प्रशिस्ती मिळवली होती.
आयसीसीने जाहिर केलेल्या टी-20 क्रमवारीत भारत 125 रेटिंग्ससह अव्वंल स्थानी कायम आहे. अफगाणिस्तानला बांगलादेश विरूद्धची टी-20 मालिका जिंकून 4 रेटिंग्सची कमाई करता आली.
मात्र त्यांना अव्वल 10 मध्ये स्थान मिळवता आले नाही. टी-20 मालिकेतील पराभवामुळे बांगलादेशला 5 रेटिंग्स गमवावे लागले आहेत.
आयससीची टी-20 क्रमवारी जाहीर झाल्यानंतर रशिद खान समाधान व्यक्त केले. तो म्हणाला , “टी-20 गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राहिल्याले मी आनंदी आहे. मला या अव्वल स्थानापेक्षा आमच्या संघाने बांगलादेश विरूदध जिंकलेल्या मालिकेचा जास्त आनंद झाला आहे.”
टी-20 फलंदाजी क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम 881 रेटिंग्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल 389 रेटिंग्ससह अव्वल आहे.