---Advertisement---

‘मी कर्णधारपदापासून दूरच बरा’, राशिद खानने सांगितले नेतृत्वपद नाकारण्याचे कारण

---Advertisement---

गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान संघात सातत्याने नेतृत्वबदल केले जात आहे. नुकतेच अफगाणिस्तानने वनडे आणि कसोटी संघासाठी हशमतुल्लाह शाहिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. परंतु, टी२० संघाचे नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न अफगाणिस्तान समोर आहे. त्याच्यासमोर राशिद खानचा पर्याय आहे. मात्र, राशिदने नेतृत्वपद सांभाळण्यास नकार दिला आहे.

राशिदला यापूर्वी २०१९ विश्वचषकानंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी अफगाणिस्तान संघाचे नेतृत्वपद देण्यात आले होते. मात्र, नंतर तो या पदावरुन पायउतार झाला. तो सध्या अफगाणिस्तानच्या टी२० संघाचा उपकर्णधार आहे.

राशिद खान क्रिकइंफोशी बोलताना सांगितले की, “मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी एक खेळाडू म्हणूनच उत्तम कामगिरी करू शकतो. मी उपकर्णधार म्हणूनच कामगिरी करेन. जर गरज पडली तर मी कर्णधाराला मदत करेन. पण मी या पदापासून दूर असलेला बरा आहे.”

राशिद खाननी सांगितले की, ‘जर तुमच्याकडे दोन वर्ष असतील आणि तुम्ही स्वतःमध्ये जर तुमचा खेळ सांभाळून गोष्टी समजून घेत असाल तर तुम्ही एक उत्तम कर्णधार होऊ शकता. मी एकदा कर्णधार म्हणून पद सांभाळत होतो आणि बोर्डाला माझी मानसिकता माहिती आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा मी उपकर्णधार म्हणून असताना ते कर्णधार पदासाठी उत्कृष्ट खेळाडू शोधत आहेत’. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड लवकरच टी२० संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे.

या आठवड्यात सुरुवातीलाच रशीद खानने अफगाणिस्तान संघाला उच्च स्थानवर पोहचवण्याचे श्रेय माजी कर्णधार असगर अफगाणला दिले आहे. अफगाणला काहीदिवसांपूर्वीच अफगाणिस्तान संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्याच्याऐवजी हशमतुल्लाह शाहिदीला वनडे आणि कसोटी कर्णधार करण्यात आले आहे. त्यामुळे हशमतुल्लाह शाहिदीचेही राशिदने अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाचे ‘ठाकूर आणि गब्बर’; शिखर धवनने शेअर केलेला ‘हा’ फोटो जोरदार व्हायरल

काय सांगता! ब्लाइंड डेटवर गेलेला विराट ‘या’ कारणामुळे केवळ ५ मिनिटात आला पळून, स्वत:च केला खुलासा

केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---