---Advertisement---

‘हे गाणे आणि सुर्यास्त’,पीएसएल स्पर्धेपूर्वीच राशिद खानने केला सुंदर व्हिडिओ शेअर; दिसला वेगळ्याच अंदाजात

On: गुरूवार, जून 10, 2021 6:45 PM
---Advertisement---

कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार म्हणून राशिद खान ओळखला जातो. अफगाणिस्तानच्या हा दिग्गज गोलंदाज भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवतो. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर आबुधाबीच्या सूर्यास्ताचा एक सुंदर व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओला राशिदच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंत केले आहे.

आजकाल तो समाजमाध्यमांत सक्रिय दिसून येत असतो. नुकताच राशिद खानने आपल्या इन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेयर केला आहे, त्यात जुबिन नटियालचे प्रसिद्ध गाणे “दिल चाहते हो या जान चाहते हो” हे गाणे समुद्रकिनाऱ्यावर चालताना लावलेले आहे. हा व्हिडीओ अबुधाबीमधील आहे. राशिदच्या या व्हिडिओला त्याचे चाहते पसंती देत असून त्याच्या अफगाणिस्तानच्या संघ सहकाऱ्यांनी देखील व्हिडिओचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला राशिदने कॅप्शन दिले आहे की ‘हे गाणे आणि सुर्यास्त’.

https://www.instagram.com/p/CP3QlWnh2S5/

हा दिग्गज फिरकीपटू पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या दुसऱ्या भागात सहभागी होण्यासाठी आबुधाबीला गेला आहे. पीएसएलला 9 जूनपासून सुरूवात झाली असून पहिला सामना लाहोर कलंदर आणि इस्लामाबाद युनायटेडदरम्याम खेळला गेला. पीएसएल स्पर्धेत राशिद खान लाहोर संघाकडून खेळतो.

अफगाणिस्तानचा या दिग्गजाची सध्या भारतात देखील चर्चा असते. ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राशिद खानसोबत एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्यामध्ये वॉर्नर हा राशिद खान आणि मनीष पांडेसोबत डान्स करताना दिसून आला होता.

काही दिवसांपूर्वी युट्युब कार्यक्रम क्रिकास्टमध्ये राशिद खानने सांगितले की, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला क्षेत्ररक्षण सांभाळून करायचा सल्ला दिला होता. धोनीने त्याची प्रशंसा करतांना सांगितले होते की, राशिद एकटाच आहे आणि जर त्याला दुखापत झाली तर लोक निराश होतील. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार असून राशिद खान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाचं प्रतिनिधित्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विश्वचषक २०११च्या सेमी फायनलमध्ये मी असतो, तर भारतीय फलंदाजांची हाडे खिळखिळी केली असती’

…आणि ‘त्या’ दिवशी विराटने सामनाही जिंकला व करोडो भारतीयांची मनंही, पाहा व्हिडीओ

क्रिकेटच्या पंढरीत बरोबर ३५ वर्षांपुर्वी टीम इंडियाने पहिल्यांदा फडकवली होती विजयी पताका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---