सेन्च्यूरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड(South Africa vs England) संघात सुुपरस्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात रस्सी वॅन दर दसनने(Rassie van der Dussen) 51 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. दसनचा हा पदार्पणाचा कसोटी सामना(Test Debut) आहे.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे, टी20 आणि कसोटी या तीनही प्रकारच्या पदार्पणाच्या सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने याचवर्षी 19 जानेवारीला पाकिस्तान विरुद्ध वनडे पदार्पण(ODI Debut) करताना 93 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्याने 9 ऑक्टोबर 2018ला झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण(T20I Debut) करताना 56 धावांची खेळी केली होती.
दसनने सध्या सेन्च्यूरियन येथे सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 6 धावा केल्या होत्या, पण त्याने दुसऱ्या डावात शानदार खेळ केला. त्याने या 51 धावा 67 चेंडूत 5 चौकारांसह पूर्ण केल्या.
त्याच्या या अर्धशतकी खेळीव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात एन्रीच नोर्जे(40) आणि व्हर्नोन फिलँडर(46) यांनीही चांगला खेळ केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने या डावात सर्वबाद 272 धावा केल्या आणि पहिल्या डावात घेतलेल्या 103 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर विजयासाठी 376 धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आला होता. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यातील दसनची कामगिरी –
कसोटी पदार्पण – 6 धावा आणि 51 धावा, विरुद्ध इंग्लंड, सेन्च्यूरियन, 2019
वनडे पदार्पण – 93 धावा, विरुद्ध पाकिस्तान, पोर्ट एलिझाबेथ, 2019
टी20 पदार्पण – 56 धावा, विरुद्ध झिम्बाब्वे, इस्ट लंडन, 2018
https://twitter.com/OfficialCSA/status/1210868956845748230
https://twitter.com/Maha_Sports/status/1210890237997486081
https://twitter.com/Maha_Sports/status/1210868712087023617