सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सर्वच देशांचे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. यामध्ये भारताचाही नंबर लागतो. मागील काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळामध्ये भारताने खूप चांगले प्रदर्शन केले आहे. कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटामध्ये अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्याचबरोबर आज तो सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र उपांत्य फेरी सामन्यातील एका प्रसंगाने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
त्या प्रसंगाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. खरंतर या फोटोमध्ये असे दिसून येत आहे की, रवीच्या विरोधात खेळत असलेला कझाखस्तानचा कुस्तीपटू सनायव नूरिस्लाम सामन्यादरम्यान रवीला दाताने चावत होता. परंतु असे असूनही रवी सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
प्रतिस्पर्धी रवीला दातांनी चावला
कझाखस्तानच्या नुरिस्लाम सनायेवने २३ वर्षीय रवीला आपल्या अंगावरुन बाजूला सारण्यासाठी दातांनी चावत होता. अगदी रवीच्या हातावर त्याच्या चाव्याचे वणही उमटले. पण तरीही हा भारतीय कुस्तीपटू आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी खंबीरपणे उभा राहिला होता. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात घडलेल्या या प्रसंगामुळे चाहत्यांनी नूरिस्लामवर टीकेची झुंबड उडवली आहे.
Pic credit : @SportwalkIndia Follow their account. They tweet such accurate analysis picture of all sports which include india.
— Anurag Sinha (@anuragsinha1992) August 4, 2021
वीरेंद्र सेहवागने दिली यावर प्रतिक्रिया
हे फोटो शेअर करताना माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लिहिले की, ‘हे किती चुकीचे आहे. पण असे असूनही कुस्तीपटू रवीचा उत्साह आणि प्रयत्न कमी झाले नाहीत.’ वीरेंद्र सेहवागने कझाखस्तानच्या कुस्तीपटूचे हे कृत्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर सेहवागने लिहिले की, ‘अद्भुत रवी, तू अभिमानाने देशाची मान उंचावली आहेस.’
How unfair is this , couldn’t hit our #RaviDahiya ‘s spirit, so bit his hand. Disgraceful Kazakh looser Nurislam Sanayev.
Ghazab Ravi , bahut seena chaunda kiya aapne #Wrestling pic.twitter.com/KAVn1Akj7F— Virender Sehwag (@virendersehwag) August 4, 2021
सुवर्णपदकावर देशाची नजर
रवी कुमारने अंतिम फेरीत प्रवेश करताच टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पुन्हा एकदा पदकावर भारताचे नाव निश्चित झाले आहे. त्याचबरोबर आता देशाच्या नजरा सुवर्णपदकावर लागल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम
उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू