भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सामन्याचा नायक ठरलेल्या हार्दिक पंड्या याचे विशेष कौतुक करणारे एक ट्विटही केले.
सामनावीर ठरलेल्या हार्दिकने आधी गोलंदाजी करताना आपल्या 4 षटकात फक्त 35 रन देऊन पाकिस्तानचे तीन महत्त्वाचे फलंदाज टिपले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत असताना अगदी कोणताही अतातायीपणा न करता 17 चेंडूमध्ये 4 चौकार आणि एक षटकार मारत त्याने भारतीय संघाला आणि समस्त भारतीयांना जल्लोषाची संधी दिली.
त्याच्या या कामगिरीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्री यांनी हार्दिकचे तोंडभरून कौतुक केले. शास्त्री यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, जो भारत-पाकिस्तान सामन्यातील आहे. त्यांनी या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारताला अंतिम रेषेपार नेण्यासाठी सर्वोत्तम T20 अष्टपैलू खेळाडूची गरज आहे.”
Needed the best T20 all-rounder in the business to power India across the finish line – @hardikpandya7 🇮🇳🙌🏻 pic.twitter.com/78zXFF3Ctm
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 29, 2022
यापूर्वी देखील रवी शास्त्री यांनी बोलताना हार्दिकचे कौतुक करत म्हटलेले की, हार्दिक संघात नसल्यास भारतीय संघाचे संतुलन बिघडते.”
साखळी फिरतील हा सामना रंगला असला तरी, दोन्ही संघांमध्ये पुढील रविवारी देखील सामना होऊ शकतो. आशिया चषकाच्या प्रारूपानुसार सुपर फोरमध्ये हे संघ दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केल्यास अंतिम सामना देखील याच संघांमध्ये होऊ शकतो. स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…