भारत विरूद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला (23 फेब्रुवारी) दुबईच्या मैदानावर रंगला आहे. या शानदार सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून फखर झमानच्या (Fakhar Zaman) जागी इमाम उल हक मैदानात आला. तथापि, फलंदाजी करताना तो थोडा दुर्दैवी ठरला. दरम्यान तो 10 धावांवर धावबाद झाला. इमामला अक्षर पटेलने (Axar Patel) धावबाद केले.
इमाम धावबाद होताच, समालोचन करत असलेले सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्याला ट्रोल केले आणि इंझमामची आठवण काढली. दोघांनीही या धावबादची मजेदार पद्धतीने खिल्ली उडवली.
इमाम धावबाद झाला तेव्हा इंग्रजी भाष्य करत असलेले रवी शास्त्री यांनी प्रथम विनोदी पद्धतीने विधान केले की, “इमाम उल हक धावबाद झाला. इंझमामही धावबाद व्हायचा. कुटुंबात चालतंय का?” यावर सुनील गावस्कर यांनी अधिक मजेदार टीका केली आणि म्हणाले, “नाही, कुटुंबात चालत नाही कारण त्यांचे कुटुंब चालू शकत नाही.”
गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी हे मजेदार विधान केले तेव्हा माजी दिग्गज पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम देखील त्यांच्यासोबत समालोचन पथकात उपस्थित होता. वसीम अक्रम, रवी शास्त्री आणि गावस्करच्या विनोदांचा आनंद घेत होता आणि मनापासून हसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश पेक्षा पाकिस्तान संघाने खेळले जास्त डॉट चेंडू., जाणून घ्या बाकीच्या संघाची अवस्था
सामना सुरू होण्याआधीच निकाल स्पष्ट? IIT बाबांची खळबळजनक भविष्यवाणी!
संघा बाहेर असूनही बुमराहचा जलवा कायम, आयसीसी पुरस्कारांसाठी कौतुकाचा वर्षाव!