---Advertisement---

भारतीय ड्रेसिंग रूममध्ये ‘या’ नावाने जडेजाला मारली जाते हाक, खुद्द शास्त्री गुरूजींनी केला उलगडा

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 8:08 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा भलताच फॉर्ममध्ये आहे. आयसीसी विरूद्ध रविवारी (२५ एप्रिल) झालेल्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी करत सर्वांची मने जिंकली. त्याने चेन्नईच्या डावातील अखेरच्या षटकात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या एकाच षटकात ३७ धावा वसूल करून विक्रम बनवला. सर्वजण जडेजाचे कौतुक करत असताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील जडेजाच्या कामगिरीवर खूष दिसले. त्यांनी ट्विटकरून भारतीय ड्रेसिंग रूममधील जडेजाच्या टोपण नावाचा खुलासा केला.

जडेजाचे हे आहे टोपणनाव
जडेजाच्या कामगिरीने खूप झालेल्या रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक करताना एक ट्विट केले. जडेजाच्या आरसीबीविरूद्धच्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याचे टोपण नाव ‘सर’ हे ट्रेंड होत होते. हे टोपण नाव त्याला एमएस धोनीने दिले आहे. मात्र, शास्त्री यांनी ट्विटद्वारे जडेजाच्या भारतीय ड्रेसिंग रूममधील नावाचा खुलासा केला. शास्त्री यांनी ट्विटमध्ये लिहीले, ‘आम्ही उगीच त्याला गॅरी जडेजा म्हणत नाही.. निव्वळ अप्रतिम’

गॅरी या नावाचा संबंध वेस्ट इंडीजचे सर्वकालीन महान अष्टपैलू गॅरी सोबर्स यांच्याशी लावला गेला. गॅरी सोबर्स यांना क्रिकेट इतिहासातील आजवरचे सर्वात्कृष्ट अष्टपैलू म्हटले जाते.

https://twitter.com/RaviShastriOfc/status/1386319898595545090

जडेजाची अविस्मरणीय कामगिरी
आरसीबी विरूद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने अविस्मरणीय कामगिरी केली. फलंदाजी करताना २८ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा त्याने बनवल्या. तर, गोलंदाजी करताना एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल व वॉशिंग्टन सुंदर यांचे बळी त्याने आपल्या नावे केले. डॅनियल ख्रिस्टीयन त्याच्या थेट फेकीवर धावबाद झाला. त्याने फलंदाजी करताना अखेरच्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ५ षटकारांच्या मदतीने ३७ धावा लुटल्या. या कामगिरीसाठी जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या –

आरसीबीविरूद्ध फलंदाजीला धोनीच्या आधी का आला जडेजा? खुद्द कर्णधारानेच केला उलगडा

खेळाडूंच्या माघारीने आयपीएलचे आयोजन धोक्यात? बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

Video: मुंबईला रामराम ठोकत धोनी आणि कंपनीची दिल्लीकडे कूच; ‘या’ संघाबरोबर होणार सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---