भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पराभूत केले होते. हा विजय भारतीय संघासाठी (team india) महत्वाचा होता. या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी काही खास झाली नव्हती. मात्र, शेवटी संघाने अप्रतिम केला. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळलेला सामना मालिका जिंकण्यासाठी निर्णायक ठरला. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल (shubman gill) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) यांनी महत्वापूर्व भूमिका पार पाडली होती. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शांत्रींना या सामन्यादरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
गाबा स्टेडियमवरील या सामन्याच्या दुसऱ्या डावात गिलने ९१ धावांची दमदाख खेळी केली होती. तर, दुसरीकडे पंतने नाबाद ८९ धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या शास्त्रींना या दोघांमधील एक चर्चा ऐकली होती आणि त्यानंतर ‘लगे रहो’ असे म्हणून पुढे निघून गेले होते. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्रींनी या मजेशीर किस्स्याचा खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, “मला वाटते की ते अविश्वसनीय होते, विशेषतः शेवटचा दिवस. मला माहीत होती की चहापाण्यापर्यंत आम्ही आमच्या तीन विकेट्स गमावल्या आहेत आणि पंतला काहीही बोलण्यात अर्थ नव्हता. मी तुम्हाला सांगु शकत नाही की, काय बोलणे झाले होते. मी बाथरूममध्ये चाललो होतो. तेव्हा गिल आणि पंत चर्चा करत होते. गिलने अप्रतिम फलंदाजी केली आणि ९१ धावांच्या खेळीने खूपकाही व्यवस्थित केले होते. मी थांबलो आणि या दोघांची चर्चा ऐकली. मी म्हणालो ‘लगे रहो.’ याव्यतिरिक्त काहीच नाही. मला माहीत होते की, यांना जिंकण्यासाठी जायचे आहे. मला अशाप्रकारचे क्रिकेट आवडते. असे केल्यामुळे तुम्ही पराभूत होऊ शकता, पण जर जिंकलात, तर चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याठिकाणी हेच केले.”
दरम्यान, गाबा स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांनी आघाडी घेतली होती. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकुरने अनुक्रमे ६२ आणि ६७ धावां केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ २९४ धावांवर गुंडाळला गेला. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर गिलने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव सावरला होता. डावाच्या शेवटच्या टप्प्यात पंत आणि सुंदर यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि भारताला विजय मिळवून दिला होता.
महत्वाच्या बातम्या –
कधी द्रविडला नाचताना पाहिलेले का? दक्षिण आफ्रिकेत तेही घडले! पाहा व्हिडिओ
आता तयारी मालिकेत विजयी आघाडीची! दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा व्हिडिओ
भान हरपून नाचायचंय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष
व्हिडिओ पाहा –