भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) यांच्या मार्गदर्शनात संघाने अनेक विदेश दौऱ्यात विजय मिळवला. शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकानंतर संपला. आता त्यांनी त्याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील सर्वात अवघड दिवस कोणता होता, याचा खुलासा केला आहे.
शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक विदेश दौरे यशस्वी करून दाखवले. २०१९ विश्वचषकात उपांत्य सामन्यापर्यंत आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्थेच्या अंतिम सामन्यापर्यंत संघ त्यांच्याच मार्गदर्शनाखालीच पोहोचला होता. मात्र, टी२० विश्वचषकात संघाने खूपच खराब प्रदर्शन केले. शास्त्रींच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सलग दोन वेळा कसोटी मालिका जिंकल्या. याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शास्त्रींना मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळातील सर्वात वाईट दिवस पाहावा लागला होता, जेव्हा भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाला होता
शास्त्रींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, “हे पाहा, प्रशिक्षक नेहमीच निशाण्यावर असतात. याला काहीच पर्याय नाही. हीच सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच यासाठी तयार राहावे लागेल. मला माहिती होते की, यातून वाचण्याचा कोणताच मार्ग नसेल. ३६ धावांवर सर्वबाद (डिसेंबर २०२०, एडिलेड दिवस रात्र कसोटी सामना) हा सर्वात खराब क्षण होता. आम्ही सर्वजण हैराण होतो. आम्ही अनेक दिवस धक्क्यात होतो की, असे कसे काय होऊ शकते?”
“हा फक्त माझ्यासाठीच खराब दिवस नव्हता. मी सर्वात पहिल्यांदा माझा हात वर करेल आणि म्हणेल की, मी यासाठी जबाबदार होतो. मी खेळाडूंना सांगितले की, त्यांनी यावर लक्ष द्यावे की, ते पुढे काय करू शकतात. खेळाडू चकित होते. ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर एक महिन्यांनी १९ जानेवारीला आम्ही मालिका जिंकली होती. मी अजूनही विचार करत आहे की, असे कसे झाले ? मी वचन देतो, जोपर्यंत मी जिवंत राहिल, लोक त्या मालिकेतील विजयाची चर्चा करत राहतील,” असे शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक सामन्यात नाणेफेकीवेळी विराटसोबत काय बोलणं झालं? बाबर आजमचा खुलासा
करारा जवाब! टीकाकारांची तोंडे बंद करत वॉर्नरने पटकावला ‘हा’ मानाचा पुरस्कार
दुसऱ्या ऍशेस सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील दिग्गज गोलंदाज झाला बाहेर