भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी रविचंद्रन अश्विन सोबतच्या मुलाखतीत एक मोठे रहस्य उलगडले आहे. अरुण यांनी स्पष्ट केले की जेव्हा जेव्हा गोलंदाजांना चौकार पडतो तेव्हा रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात. रवी शास्त्री यांना अजिबात वाटत नाही की कोणत्याही गोलंदाजाने एक धाव देखील द्यावी.
अरुण म्हणाले,” रवी शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये सामना व्यवस्थितपणे बघतात. जेव्हा गोलंदाजाला चौका मारला जातो तेव्हा ते प्रचंड संतापतात. शास्त्री यांच्या मते कोणत्याही गोलंदाजाने एकही धाव द्यायला नको. जेव्हा आमचा संघ गोलंदाजी करत असतो तेव्हा शास्त्रींना विकेट हवे असतात व जेव्हा आमचे फलंदाज फलंदाजी करत असतात तेव्हा त्यांना धावा हव्या असतात. जेव्हा गोलंदाजाला दोन चौकार लगावले जातात तेव्हा रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात. एक चौकार गेल्यानंतर माझ्या लक्षात येते की आता शास्त्री आपल्यावर चिडू शकतात.”
रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियामध्ये सगल दोनवेळा कसोटी मालिका विजय
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनातच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाने अविश्वसनीय विजय मिळवला आहे. ही भारतीय संघाची शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याची सलग दुसरी वेळ आहे.
नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती. मात्र या सर्व परिस्थितीतही रवी शास्त्री व कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताच्या या विषयाबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वातून रवी शास्त्री यांचे कौतुक केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गोलंदाजी प्रशिक्षक भरुत अरुण यांनी दिली माहिती, ‘अशाप्रकारे’ ओळखले सिराजचे कौशल्य
“तुमचा मुलगा असल्याचा अभिमान वाटतो”, मोहम्मद शमीची वडिलांसाठी भावूक पोस्ट