नॉटिंगहॅम। गुरुवारी(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला.
त्यामुळे हा सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांना नाराज होऊन परतावे लागले. असे असले तर सामना न झाल्याने नाराज असलेल्या चाहत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी एमएस धोनीची जर्सी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीमधून फडकवली आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला.
काही वृत्तानुसार, भारतीय संघाच्या डेसिंग रुमच्या बाल्कनीखाली अनेक चाहते सामना सुरु होईल या आशेने वाट पाहत होते. तसेच धोनीचे नाव घेऊन ओरडतही होते. त्यावेळी शास्त्रींनी बाल्कनीमधून धोनीची 7 क्रमांकाची जर्सी फडकवली आणि चाहत्यांना खूश केले.
Fans were waiting under the balcony of the Indian dressing room were shouting "Dhoni, Dhoni" at Trent Bridge.
Indian Head coach and former cricketer Ravi Shastri came to the dressing room balcony and displayed Mahendra Singh Dhoni’s No.7 jersey to the fans #MSDhoni #DhoniAtCWC19 pic.twitter.com/RxWozypgTH
— 𝑻𝑯𝑨𝑳𝑨 (@Vidyadhar_R) June 14, 2019
हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. त्यामुळे गुणतालिकेत सध्या न्यूझीलंड 7 गुणांसह अव्वल स्थानावर तर भारत 5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ आत्तापर्यंत या विश्वचषकात एकही सामना पराभूत झालेले नाही.
या विश्वचषकात भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध रविवारी(16 जून) मॅनचेस्टर येथे रंगणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडच्या जो रुटने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी
–बेन स्टोक्सच नाही तर इंग्लडच्या या क्रिकेटपटूनेही घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ