आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ नेहमी चोकर असल्याचे सिद्ध होत आहे आणि प्रत्येक वेळी अंतिम किंवा उपांत्य फेरीत पराभूत होत आहे. भारतीय संघाला मिळत असलेल्या या पराभवामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जर रवी शास्त्री यांना या पदावरून दूर केले; तर त्यांच्या जागी राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात. परंतु जर द्रविड यांनीही काही कारणास्तव ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला; तर मग खालील 3 दिग्गज खेळाडूपैकी एक भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. चला तर पाहून कोण आहेत ते दिग्गज?
1) माईक हेसन
न्यूझीलंडचे प्रशिक्षक असताना माईक हेसन खूप यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी चांगले संबंधही आहेत. अशा परिस्थितीत रवी शास्त्रीनंतर माईक हेसन यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
2) वीरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागही रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत आहे. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा पदभार सोडल्यानंतर वीरेंद्र सेहवागने देखील मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. परंतु त्यावेळी तो प्रशिक्षकपदी नियुक्त झाला नव्हता, तेव्हा तो खूप नाराज झाला होता.
3) टॉम मूडी
माजी ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू टॉम मूडी यांना देखील मुख्य प्रशिक्षकपद दिले जाऊ शकते. कारण टॉम मूडीकडे प्रशिक्षण देण्याचा खूप चांगला अनुभव आहे. टॉम मूडी हे प्रशिक्षणाच्या बाबतीत नेहमी सक्रीय असतात. त्यामुळेच टॉम मूडी यांना रवी शास्त्रीच्या जागी प्रशिक्षकपद सांभाळण्यास दिले जाण्याची शक्यता आहे. टॉम मूडी यांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनराइजर्स हैदराबाद संघाचे प्रशिक्षकपद उत्कृष्ट पद्धतीने सांभाळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान, विरोधकांवर कारवाई
अस्सल चाहता! १३ वर्षांनंतर शहरात आला माही, एका भेटीसाठी पठ्ठ्याने करुन घेतलं ट्रान्सफर
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…