भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियवर शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झाली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने भारताने 21 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या डावात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यां खेळाडूंच्या जोरावर भारततीय संघ कसाबसा 262 धावांपर्यंत पोहोचू शकला. दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा एक धाव पुढे आहे.
A vital fifty partnership when the going got tough ????????@ashwinravi99 ???? @akshar2026 #TeamIndia ???????? now inching closer to the 200-run mark here in Delhi ✅
Scorecard ▶️ https://t.co/hQpFkyZGW8…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/GWwSStHNjQ
— BCCI (@BCCI) February 18, 2023
उभय संघांतील पहिला कसोटी सामना नागरपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण यावेळीही ऑस्ट्रेलियन फलंदाज कर्णधाराच्या निर्णयाला साजेसे प्रदर्शन करू शकले नाहीत. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 263 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 21 धावांच्या पुढे खेळू लागला आणि संघातील फलंदाज स्वस्तात बाद होताना दिसले.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल सारखे महत्वाचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत. पण आठव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin ) आणि अक्षर पटेल (Axar Patel ) या दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. अश्विनने 37 तर अक्षरने 74 धावा कुटल्या. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 177 चेंडूत 114 धावांची भागीदारी झाली. भारताचा पहिला डावा 262 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नाथन लायनसाठी दिल्लीची खेळपट्टी चांगलीच फायद्याची ठरली. लायनने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट्स नावावर केल्या. (Ravichandran Ashwin and Akshar Patel played well in the first innings of the Delhi Test, but could not give the team the lead.)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 5 गोलंदाजांचा पदार्पणाच्या कसोटीतील पहिला बळी ठरलाय कोहली, यादीतील तीन खेळाडू एकाच देशाचे
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय






