---Advertisement---

अश्विन जिथे विक्रम तिथे! झहीरला मागे टाकत अश्विनने केलाय ‘मोठा विक्रम’, ‘त्या’ यादीत थेट चौथ्या स्थानी झेप

On: बुधवार, फेब्रुवारी 24, 2021 6:03 PM
Photo Courtesy : ICC Twitter AC
---Advertisement---

अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील तिसऱ्या मात्र पहिल्याच डे-नाईट कसोटीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यातही टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याने त्याचा फॉर्म कायम असल्याचे दाखवत चेन्नई कसोटीप्रमाणेच इथेही विकेट्स घेतल्या. मात्र, यावेळी अश्निनने एक मोठा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. इंग्लिश संघाचा फलंदाज ‘ओली पोप’ याला बाद करताच आश्विनने भारताच्या एका माजी दिग्गज गोलंदाजाला विक्रमांच्या यादीत मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे.

ओली पोप याची विकेट ही अश्विनच्या आजवरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५९८ वी विकेट होती. म्हणजेच भारताकडून खेळताना आर. अश्विन याने आतापर्यंत ५९८ बळी स्वतःच्या खात्यात जमा केले आहेत. परंतू, हा आकडा आज (२४ फेब्रुवारी) गाठताच त्याने भारताकडून एकत्रित सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत थेट चौथे स्थान पटकावले आहे. यावेळी त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याला मागे टाकले आहे.

भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज…

भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या प्रथम पाच गोलंदाजांमध्ये संघाचे माजी फिरकीपटू आणि दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे, माजी गोलंदाज हरभजन सिंग, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज कपील देव, स्वतः अश्विन आणि वेगवान गोलंदाजीचा बादशाह झहीर खान याचा समावेश होतो.

 – खेळाडू आणि त्यांनी घेतलेल्या विकेट (क्रमानुसार)
१. अनिल कुंबळे – ९५३ विकेट्स
२. हरभजन सिंग – ७०७ विकेट्स
३. कपिल देव – ६८७ विकेट्स
४. रविचंद्रन अश्विन – ५९८ विकेट्स
५. झहीर खान – ५९७ विकेट्स

अहमदाबादेतील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर खेळत असताना अश्विनने केलेला हा पराक्रम नक्कीच गौरवास्पद आहे. याबरोबरच त्याने चेन्न्ई प्रमाणेच इथेही विक्रमांची मालिका कायम ठेवल्याने, जिथे अश्विन तिथे विक्रम अशी परिस्थिती तयार झाल्याचे बोलले जात आहे.

अश्विनचे या विक्रमाच्या यादीत सध्या चौथे स्थान आहे. परंतू, त्याचा सध्याचा फॉर्म पाहता आणि त्याच्याकडे असलेला वेळ पाहता, तो लवकरच आणखीन वरचे स्थान गाठू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. तरिही त्याच्यासाठी ही वाट तितकी सोपीही नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: ‘आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करतोय’, म्हणत क्रिकेटपटू मनोज तिवारीने केला ‘या’ पक्षात प्रवेश

शंभर कसोटी खेळणारा इशांत ११ वा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य १० क्रिकेटर

Video : ‘अशी’ करुन दिली विराटने भारतीय खेळाडूंची राष्ट्रपतींशी ओळख; इशांतला १०० व्या कसोटीनिमित्त खास भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---