बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावांचा डोंगर उभा केला. त्याचवेळी भारताकडून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज गारद केले. यासोबतच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सर्वात यशस्वी गोलंदाज तो बनला.
ऑस्ट्रेलियन संघाने पहिला दिवस व दुसऱ्या दिवसातील जवळपास अडीच सत्रे आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चिवट खेळाचे प्रदर्शन करत मोठी धावसंख्या उभारली. भारतीय संघाला बळींसाठी संघर्ष करावा लागला असला तरी, रविचंद्रन अश्विनने 47.2 षटके गोलंदाजी करताना 91 धावा देत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अनेक विक्रम त्याच्या नावे जमा झाले.
पहिल्या डावातील सहा बळींसह अश्विन या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत पाच डावात 28 बळी आपल्या नावे केले. तसेच मायदेशात खेळताना त्याने तब्बल 26 व्या वेळी पाच बळी टिपण्याची कामगिरी केली. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत त्याने नॅथन लायनच्या 113 बळींची बरोबरी केली. भारतात बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून देखील त्याची नोंद झाली. याच डावात त्याने अनिल कुंबळे यांना मागे टाकत (111 बळी) भारतासाठी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
(Ravichandran Ashwin Becomes Most Successful Bowler In Border-Gavaskar Trophy History He Surpass Anil Kumble)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! धावांचा डोंगर उभा राहताच कर्णधार रोहित हादरला, पाणी घेऊन आलेल्या सहकाऱ्यावर मोक्कार चिडला
टीम इंडियाच्या गोलंदाजीची पिसे काढत ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनने बनवला मोठा रेकॉर्ड, स्वप्नही झाले पूर्ण