आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला आता फार दिवस राहिले नाहीत. 5 ऑक्टोबर या दिवसापासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र, या स्पर्धेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झाली नाहीये. सध्या भारतीय संघाच्या मधल्या फळीविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही विस्फोटक फलंदाज सर्जरीनंतर फिट आहेत आणि दोघांना आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले आहे. अशातच भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला अश्विन?
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने म्हटले की, एमएस धोनी (MS Dhoni) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्या निवृत्तीनंतर केएल राहुल (KL Rahul) याने त्यांची जागा घेतली आहे. हा खेळाडू असताना संघाला मधल्या फळीत कोणतीही समस्या नाहीये.
भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारतीय संघ धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर मधल्या फळीबाबत खूपच चिंतेत आहे. मात्र, राहुलने ही कमतरता पूर्ण केली आहे. तो 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी फिट आहे. अश्विनला आशा आहे की, राहुल फिट होऊन आशिया चषक 2023 संघातील पहिला सामना खेळेल.
पुढे बोलताना अश्विन म्हणाला की, तो निश्चितरीत्या पाचव्या क्रमांकावर टिकला आहे. तसेच, तो आपला यष्टीरक्षक फलंदाजही आहे. जेव्हापासून युवराज सिंग आणि एमएस धोनी निवृत्त झाले आहेत, भारतीय संघ चौथ्या-पाचव्या क्रमांकासाठी एका धाकड खेळाडूचा शोध घेत आहे. मात्र, राहुलने ती जागा भरली आहे.
अश्विन म्हणाला की, “भारत धोनी आणि युवराज सिंग याच्या जागी चांगल्या खेळाडूच्या शोधात आहे. राहुलने ही जागा भरली आहे. तो पाचव्या क्रमांकासाठी फिट आहे. यासोबतच तो यष्टीरक्षणही करतो. पंत दुखापतग्रस्त होण्यापूर्वी राहुल या यादीत दुसऱ्या स्थानी होता. मात्र, आता ईशान किशन दुसरा यष्टीरक्षक आहे. त्याने संधीचा चांगला फायदा घेतला आहे.”
विशेष म्हणजे, राहुलने भारतासाठी आतापर्यंत 54 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 1986 धावा केल्या आहेत. राहुलने या प्रकारात 5 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 112 राहिली आहे. राहुलने वनडेत यष्टीरक्षण करताना 32 झेलही घेतले आहेत. तसेच, 2 यष्टीचीतही केल्या आहेत. राहुलची फलंदाजी क्रमाच्या हिशोबाने आकडेवारी पाहिली, तर त्याने पाचव्या क्रमांकावर चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने पाचव्या स्थानी फलंदाजी करता 18 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 99.93च्या स्ट्राईक रेटने आणि 53च्या सरासरीने 742 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 1 शतक आणि 7 अर्धशतकेही झळकावली आहेत. (ravichandran ashwin big claim on india s number 4 and 5 said about yuvraj and dhoni know here)
हेही वाचा-
अफगाणी गोलंदाजाने शादाबला धाडलं तंबूत, ‘मंकडिंग’चा असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल!
‘या’ खेळाडूला ‘दादा’चा फुल सपोर्ट; म्हणाला, ‘निवडकर्त्यांनी त्याला निवडून योग्यच केले…’