गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) श्रीलंकेच्या हंबनटोटा येथे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा वनडे सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने 1 विकेटने जिंकला. यासोबतच मालिकाही 2-0ने खिशात घातली. दुसरा सामना रोमांचकरीत्या पार पडला. या सामन्यात अफगाणी सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने 151 धावा केल्या, तर पाकिस्तानच्या इमाम उल हकने 91 आणि बाबर आझमने 53 धावांची अर्धशतकी झंझावाती खेळी केली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 5 विकेट्स गमावत 300 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, पाकिस्तानने हे आव्हान 9 विकेट्स गमावत पार केले.
असे असले, तरीही पाकिस्तानसाठी हा विजय सोपा नव्हता. अखेरच्या षटकात भरपूर ड्रामा पाहायला मिळाला. मात्र, शेवटी नसीम शाह याने पुन्हा एकदा पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर फझलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) याने शादाब खान (Shadab Khan) याला मंकडिंगने बाद केले. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. काहींनी असेही म्हटले आहे की, फारुकीने अशाप्रकारे बाद करायला नको होते. तसेच, काहींनी असेही म्हटले की, त्याने नियमांतर्गतच शादाबला बाद केले.
नेमकं काय झालं?
पाकिस्तान संघाने 49 षटकांमध्ये 290 धावा केल्या होत्या. तसेच, शादाब खान 35 चेंडूत 48 धावा करून खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला होता. त्याला पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घ्यायची होती. त्यामुळे त्याने चेंडू टाकल्या जाण्यापूर्वीच क्रीझ सोडली आणि धाव घेण्यासाठी पुढे निघाला. मात्र, अफगाणी गोलंदाज फजलहकने आधीच त्याला मंकडिंग पद्धतीने बाद करण्याचा निश्चय केला होता. त्याने गोलंदाजी चेंडू टाकण्यासाठी स्टम्पजवळ येताच शादाब खानला मंकडिंग (Shadab Khan Mankading) पद्धतीने बाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
Let's split #CricketTwitter into two!
Courtesy Farooqi's 𝔾𝕒𝕞𝕖 𝔸𝕨𝕒𝕣𝕖𝕟𝕖𝕤𝕤.#AFGvPAK pic.twitter.com/Vh2q4E46QV
— FanCode (@FanCode) August 24, 2023
शादाब खानच्या धावबादवर पाकिस्तानी चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या चेहऱ्यावरही राग पाहायला मिळाला होता. सध्या यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, तो रागाने लाल झाला आहे. तसेच, अफगाणी चाहत्यांना गुरबाजसाठी वाईट वाटत असेल. कारण, तो आपल्या संघाकडून सर्वाधिक 151 धावा करणारा खेळाडू होता. मात्र, त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. सामन्यानंतर तोही निराश दिसला.
Even they made babar looks angry. 😤 ❤️🔥#BabarAzam𓃵 #BabarAzam #PAKvAFG #NaseemShah pic.twitter.com/697t3HhNXd
— Anas Tweets (@tweeet_by_anass) August 24, 2023
Cricket is a gentleman's game.
It's never Sportsmanship🙏
ICC should ban mankading out.
Congratulations Pakistan👏
Remember the name Naseem Shah🔥🔥 pic.twitter.com/1pADKnHZNg— Naimur Rahman🇧🇩 (@NaimurR54946059) August 24, 2023
Mankading is not cheating guys, this is with in the rules
You gotta stay in crease before bowler takes the final stride
Stop saying that was wrong from farooqi
Rule is rule, that’s it #PAKvAFG pic.twitter.com/Li940ZH6fv— Ahsaan Elahi (@Callme_ahsaan) August 24, 2023
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा वनडे सामना 26 ऑगस्ट रोजी कोलंबो येथे खेळला जाणार आहे. (video shadab khan mankading out by fazalhaq farooqi in 2nd odi between afg vs pak)
हेही वाचा-
‘या’ खेळाडूला ‘दादा’चा फुल सपोर्ट; म्हणाला, ‘निवडकर्त्यांनी त्याला निवडून योग्यच केले…’
बॉलिवूड अभिनेत्रीचा जलवा! थेट फ्रान्समध्ये केले World Cup 2023 ट्रॉफीचे अनावरण, बनली पहिलीच भारतीय कलाकार