भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला जीवनात किंवा खेळात बचावात्मक राहणे आवडत नाही. अश्विनने स्पष्ट केले आहे की, तो अतिसंरक्षणात्मक वृत्ती स्वीकारण्याऐवजी अपयशी राहणे पसंत करेल. अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात हुशार क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. भारतासाठी 744 बळी घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनच्या शब्दांना क्रिकेट विश्वात खूप महत्त्व दिले जाते. त्यानंतर त्याचे हे विधान आता चर्चेत आले आहे.
रविचंद्रन अश्विन सध्या त्याच्या ‘आय हॅव द स्ट्रीट्स: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी’ या पुस्तकाच्या यशाचा आनंद घेत आहे. या पुस्तकात अश्विनच्या 2011 पर्यंतच्या आयुष्याचा तपशील देण्यात आला आहे. अश्विन म्हणाला, ‘मी माझं आयुष्य जगतोय. मी ‘A’, ‘B’ किंवा ‘C’ (कोणतेही ध्येय) पूर्ण करण्याचा विचार करत नाही. मला वर्तमानात जगायला आवडते. मी सामान्यतः एक सर्जनशील व्यक्ती आहे आणि मला काहीतरी करायचे आहे असे वाटत असल्यास, मी पुढे जाऊन ते करेन. ते बरोबर आहे की अयोग्य, हे मी नंतर ठरवेन.’ अश्विनने कसोटीत 516, वनडे सामन्यात 156 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 72 बळी घेतले आहेत.
लॉकडाऊन दरम्यान अश्विनने यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. क्रिकेट, क्रिकेट कायदे आणि क्रिकेटपटूंसोबतच्या मुलाखती या चॅनलवर होत असतात. त्याचे आता 15 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत.
सध्या अश्विन भारताच्या कोणत्याच मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य नाही. त्याने आपला अखेरचा वनडे सामना मागील वर्षी विश्वचषकादरम्यान खेळला होता. तर, टी20 क्रिकेटमध्ये तो दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला नाही. आयपीएलमध्ये मात्र तो नियमितपणे खेळताना दिसतो. नुकत्याच झालेल्या टीएनपीएल स्पर्धेत त्याच्या नेतृत्वातील डिंडीगुल ड्रॅगन संघाने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे अश्विन याने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
PAKvsBAN: पाकिस्तानात समोस्यांपेक्षा स्वस्त दरात मिळतायत कसोटीची तिकिटे, सोशल मीडियावर होतंय हसू!
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
इशानकडे स्वत:हून चालून आली संधी, संघात पुनरागमन करताच गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ