भारताचा फिरकीपटू आर अश्विन सध्या तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये दिन्ग्दुल ड्रॅगन्स संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत अश्विन त्याच्या गोलंदाजी शैलीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहे. त्याने सोमवारी मदुराई पँथर्स विरुद्ध अनोख्या गोलंदाजी शैलीने गोलंदाजी करत फलंदाजाला बाद केले आहे.
या सामन्याच्या शेवटच्या षटकात मदुराई संघाला 32 धावांची गरज होती. या षटकात अश्विन गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील एक चेंडू टाकताना चेंडू धरलेला हात पाठीमागे लपवला आणि गोलंदाजी टाकताना दुसऱ्या हाताची जास्त हलचाल न करता तो चेंडू टाकला.
त्यामुळे चेंडू धीम्या गतीने फलंदाजाकडे गेला. त्यावर फलंदाजाचा फटका खेळण्याचा अंदाज चूकला. त्यामुळे त्याने लाँग ऑनला मारलेल्या फटक्यावर क्षेत्ररक्षकाने बाऊंड्रीजवळ त्याचा झेल घेतला.
अश्विनच्या या गोलंदाजी शैलीचा व्हिडिओ टीएनपीएलच्या सोशल मीडिया हँडेलवर पोस्ट करण्यात आला आहे.
My experiments with the ball – Ft. @ashwinravi99!
What would you name this delivery?!#TNPL2019 #NammaPasangaNammaGethu pic.twitter.com/bHEgXY51ZU
— TNPL (@TNPremierLeague) July 23, 2019
या सामन्यात दिन्ग्दुल ड्रॅगन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 186 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून हरि निशांत(57), एन जगदीशनने(87) अर्धशतकी खेळी केली. तसेच कर्णधार अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 16 धावांचे योगदान दिले. मदुराई संघाकडून राहिल शहाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मदुराई पँथर्स संघाला 20 षटकात 9 बाद 152 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून ए शरथराजने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. त्याच्याबरोबरच अरुण कार्तिक आणि अभिषेक तन्वरने प्रत्येकी 24 धावांची खेळी केली पण अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
दिन्ग्दुल ड्रॅगन्सकडून अश्विनने 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच एम सिलांबरसनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
अश्विनने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही एकाच हाताने गोलंदाजी करत सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. त्याच्या या गोलंदाजी शैलीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
https://twitter.com/4th_Umpire_/status/1152265739446784000?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1152265739446784000&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fr-ashwin-stuns-fans-with-an-unusual-bowling-action-during-tnpl-match%2F
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार होता धोनी, पण विराटने त्याला थांबवले?
–चांगल्या कामगिरीनंतरही टीम इंडियात निवड न झाल्याने हा खेळाडू झाला निराश
–बेन स्टोक्सचा नकार; या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी केली विलियम्सनची शिफारस