वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 28 सप्टेंबर होती. या अखेरच्या दिवशी यजमान भारतीय संघाने आधी जाहीर केलेल्या आपल्या 15 सदस्यीय संघात एक बदल केला. जखमी अष्टपैलू अक्षर पटेल याच्या जागी आता अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा विश्वचषकात खेळताना दिसेल. बीसीसीआयनै त्याबाबत अधिकृत ट्विट करत माहिती दिली.
R Ashwin replaces injured Axar Patel in the 15-member squad.
We wish Axar a speedy recovery 👍 👍#TeamIndia's final squad for the ICC Men's Cricket World Cup 2023 is here 🙌#CWC23 pic.twitter.com/aejYhJJQrT
— BCCI (@BCCI) September 28, 2023
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Ravichandran Ashwin replace Axar Patel in ODI World Cup squad)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री