विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. संघातील सर्व खेळाडू या सुट्टीच्या कालावधीत मौज मस्ती करताना दिसून आले होते. तर संघातील दिग्गज फिरकीपटू आर अश्विन हा या काळात काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जोरदार सराव करताना दिसून येत आहे. तो काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या संघाकडून खेळताना तो पहिल्या डावात फ्लॉप ठरला होता. परंतु दुसऱ्या डावात त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी सराव करण्यासाठी आर अश्विन सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येत आहे. या स्पर्धेत सर्रे विरुद्ध समरसेट यांच्यात पार पडलेल्या सामन्यात आर अश्विनने दुसऱ्या डावात १५ षटके गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने २७ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. या कामगिरीमुळे समरसेट संघाचा डाव अवघ्या ६९ धावांवर संपुष्टात आला.
अश्विनने दुसऱ्या डावात लंचपुर्वी स्टीव्हन डेव्हिस, टॉम लेमनबॉय, जेम्स हिल्ड्रेथ, जॉर्ज बार्टलेट आणि रुलोफ वान दर मार्वेला माघारी धाडले. तसेच लंच झाल्यानंतर त्याने बेन ग्रीनला बाद केले होते. पहिल्या डावात त्याने ४२ षटके गोलंदाजी केली होती. यात त्याने ९९ धावा खर्च करत अवघा १ गडी बाद केला होता. यामध्ये ९ निर्धाव षटकांचा समावेश होता.
https://twitter.com/cricbuzz/status/1415527135461068805?s=20
या सामन्यात सर्रे संघाला विजयासाठी २५९ धावांची आवश्यकता होती. मात्र पाच दिवसांचा खेळ संपल्याने सर्रे संघ ४ गडी गमावत १०६ धावा करत सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. (Ravichandran Ashwin took fifer in county championship ahead of test series)
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक अकडले संकटात, ‘या’ प्रकरणी बोर्ड करणार चौकशी
कोरोनाचा दरारा! चक्क पीपीई किट घालून खेळाडूंना ट्रेनिंग देतायत श्रीलंकेचे प्रशिक्षक, बघा व्हिडिओ
मोठी बातमी! इंग्लंडमधील २ भारतीय क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह, पाहा पहिली कसोटी खेळणार की नाही?






