भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना ४ मार्च पासून सुरु होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर १२ मार्चपासून ५ टी-२० सामन्यांची मालिका आणि २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतीतून दुखापतीमुळे माघार घेतलेल्या जडेजाने मैदानावर पुनरागमन केले आहे. जडेजाने ट्विटरवर आपला सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो १०० मीटर अंतरावर धाव घेताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले आहे की, “सर्जरीनंतर पुन्हा मैदानात आलो आहे. मैदानात हा माझा पहिला दिवस आहे.” जडेजाला ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीत अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याने ऑस्ट्रेलियामध्येच आपल्या अंगठ्यावर सर्जरी केली होती. त्यानंतर तो भारतात परतला. दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबर टी२० मालिकेलाही मुकावे लागले. आता सध्या तो एनसीएमध्ये सराव करत आहे.
२३ मार्चपासून इंग्लंड संघाविरुद्ध ए दिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी- २० मालिकेसाठी संघाची घोषणा झाली आहे. तसेच एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा येत्या काही दिवसांत होऊ शकते. अशातच रविंद्र जडेजाकडे पुन्हा फिट होऊन भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी असणार आहे.
Back on the field ????????#firstday #postsurgery pic.twitter.com/SrCyLx7TQx
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) March 2, 2021
रविंद्र जडेजाची कामगिरी
रविंद्र जडेजा जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. तसेच त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने खेळलेल्या ५१ कसोटी सामन्यात ३६.२ च्या सरासरीने १९५४ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १६८ एक दिवसीय सामन्यात ३२ च्या सरासरीने २४११ धावा केल्या आहेत. यात १३ अर्धशतकांचा समावेश आहेत. तसेच त्याने खेळलेल्या ५० टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २१७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्या’ निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचं कसोटी चॅम्पियनशीपचं स्वप्न चक्काचूर; भारताला मिळालं फायनलचं तिकीट?
मानलं तुम्हाला भावांनो! टी२० मालिकेसाठी ‘या’ भारतीय खेळाडूंनी कारने केला ६७८ किमीचा प्रवास






