भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर मजबूत आघाडी घेतली आहे. फलंदाजीत अजिंक्य सोबतच रवींद्र जडेजाने देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन करणाऱ्या जडेजासाठी हा सामना फारच विशेष आहे. कारण जडेजा आपल्या क्रिकेट करिअरमधील 50 वा कसोटी सामना खेळत आहे.
दुखापतीतून सावरत दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच जडेजाने एक विक्रम तयार केला आहे. भारताकडून 50 कसोटी सामने खेळणारा 34 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. गुजरातमध्ये जन्मलेल्या रवींद्र जडेजाने आपला पहिला कसोटी सामना 13 डिसेंबर 2012 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
जडेजाने त्यानंतर मागे वळून न बघता भारतीय संघासाठी गोलंदाजी व फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केलेली आहे. जडेजाने आपल्या कसोटी करिअरमध्ये 214 बळी मिळवले आहेत. फलंदाजीमध्ये जडेजाने 1 शतक व 14 अर्धशतकांसह 1869 धावा बनवलेल्या आहेत. जडेजा फलंदाजी व गोलंदाजी सोबतच आपल्या क्षेत्ररक्षणासाठी देखील क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. वर्तमान क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी त्याची ओळख आहे.
आपल्या 50 व्या कसोटी सामन्यात जडेजाने गोलंदाजीत एक बळी मिळविला असून, फलंदाजीत कर्णधार अजिंक्य सोबत उत्तम भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जडेजा 40 धावांवर खेळत होता. तसेच त्याने रहाणेबरोबर 104 धावांची भागीदारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिराजने उलगडले गुपित! कर्णधार अजिंक्यने जेव्हा गोलंदाजी करण्यास बोलवले तेव्हा झाली ‘अशी’ चर्चा
दशकातील सर्वोत्तम आयसीसी महिला वनडे आणि टी२० संघ जाहीर, मितालीसह ‘या’ भारतीयांना मिळाले स्थान
भारत वि. ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना सिडनीऐवजी मेलबर्नमध्ये? येत्या दोन दिवसात होणार निर्णय