---Advertisement---

याद आ रही है! जड्डूला येतेय लाडक्या पत्नीची आठवण; सोशल मीडियावर व्यक्त केले दु:ख

On: सोमवार, जुलै 26, 2021 4:56 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीची आठवण येत आहे.

इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंसोबत जाण्याची परवानगी दिली होती. परंतु रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोलंकी ही काही कारणास्तव इंग्लंडला जाऊ शकली नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये असलेल्या रवींद्र जडेजाला आपल्या पत्नीची खूप आठवण येत आहे.(Ravindra Jadeja badly missing his wife riva Solanki on England tour her name make jaddu impatient)

त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच्या पत्नीचे २ फोटो शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याने या फोटोवर कॅप्शन देत, “तुझ नावही डोक्यात आले तरीही आता मला अवस्थ वाटायला लागते. खूप आठवण येत आहे तुझी” असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CRv4lfdMb4n/?utm_medium=copy_link

अब्जावधी घराण्याचा जावई आहे जडेजा
रवींद्र जडेजा आपल्या राजपुताना थाट साठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्याने ही गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यात खूप मेहनत घेतली आहे. जडेजा २०१६ मध्ये रीवा सोबत विवाह बंधनात अडकला होता. रीवा देखील मॅकेनिकल इंजिनियर आहे. यासोबतच ती गुजरातच्या प्रसिद्ध राजनैतिक कुटुंबातून आहे. तसेच तिचे कुटुंब गुजरातच्या सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक आहे.

जडेजाच्या लग्नात झाला होता गोळीबार
रवींद्र जडेजा राजपुताना घरण्यातून आहे. त्यामुळे त्याचा विवाह राजपूत रीतीप्रमाणे झाला होता. त्यांच्या विवाहात हवेत गोळीबार करणे साहजिक असते. परंतु रवींद्र जडेजाच्या विवाह सुरू असताना जेव्हा गोळीबार करण्यात आला होता, त्यावरून वाद निर्माण झाला होता. इतकेच नव्हे तर हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘क्यूटेस्ट रेनबो’; रिषभ पंतच्या ‘या’ गोष्टीवर गर्लफ्रेंडचं आलं मन, दिली प्रेमळ प्रतिक्रिया

“हसरंगा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल”, दिग्गजाने व्यक्त केला आशावाद

टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेची दुर्दशा! आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---